रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. शनिवारी राजधानी कीवसह युक्रेनच्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये स्फोट झाले. रशियन सैन्याने राजधानी कीवमध्ये प्रवेश केला असून युक्रेनच्या सैन्याशी एकमुखाने लढाई सुरू झाली आहे. दरम्यान, युक्रेनने 300 रशियन पॅराट्रूपर्सने भरलेली दोन विमाने पाडल्याचा दावा केला आहे. रशियन सैन्याने कीव विमानतळावर ताबा मिळवला आहे.
याआधी, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) रशियाविरोधात निषेधाचा ठराव मंजूर केला होता. या प्रस्तावाच्या बाजूने 11 आणि विरोधात 1 मते पडली. भारत, चीन आणि यूएई या देशांनी मतदानात भाग घेतला नाही. मात्र, रशियाने व्हेटो पॉवर वापरून हा निषेध प्रस्ताव फेटाळला.
[read_also content=”युक्रेनजवळील मित्र राष्ट्रांमध्ये सैन्य तैनात करणार! नाटो प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांची मोठी घोषणा https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/will-deploy-troops-in-friendly-countries-near-ukraine-nato-chief-jens-stoltenbergs-big-announcement-nrps-245375.html”]