महिलांमधील लठ्ठपणा वाढण्याची कारणं काय (फोटो सौजन्य - iStock)
लठ्ठपणा हा भारतीय स्त्रियांमध्ये वेगाने एक अबोल महामारी बनत आहे आणि हे विशेषत: जीवनशैलीतील बदल, उच्च तणावाचे वातावरण आणि बसून काम करणाऱ्या दिनचर्या चिंताजनक प्रवृत्तींना कारणीभूत ठरणाऱ्या शहरी भागांमध्ये दिसून येत आहे. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्शन ने समर्थन पुरविलेल्या इंडियन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनोकॉलॉजी रिसर्च मध्ये नुकत्याच प्रकाशित केल्या गेलेल्या एका पेपरमध्ये दक्षिण आशियाई स्त्रियांमध्ये मुख्य लठ्ठपणाचे प्रमाण असंतुलितरित्या जास्त असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
35 ते 49 वय असलेल्या सुमारे 50% भारतीय स्त्रिया आता वजन जास्त असणे किंवा लठ्ठपणा यांच्यासोबत आयुष्य जगत आहेत. हे त्यांच्या प्रजनन काळात सार्वजनिक आरोग्याची वाढती चिंता ठळक करून दाखवत आहे. असेही लक्षात आणून दिले गेले आले आहे की, 18-30 वय असलेल्या स्त्रिया तेवढेच वय असलेल्या पुरुषांच्या तुलनेत जास्त दराने लठ्ठपणाशी संबंधित आरोग्याच्या जोखमींप्रती असुरक्षित असल्याचे दर्शवित आहेत आणि हे पिढ्यानपिढ्या पसरलेल्या संकटाचा मुद्दा मांडत आहे (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगते आकडेवारी
एन.एफ.एच.एस-5 च्या आकडेवारीनुसार, भारतातील 33.5% शहरी स्त्रिया आणि 19.7% ग्रामीण स्त्रिया लठ्ठ असून आयुष्य जगत आहेत आणि जीवनशैलीतील बदल, तणाव आणि बसून काम करणाऱ्या सवयी या वाढीस कारणीभूत आहेत. आहार घेण्याच्या सवयी खराब असणे, शारीरिक हालचाली कमी करणे आणि पी.सी.ओ.एस व गर्भावस्थेतील मधुमेहासारख्या चयापचय विकारांचे प्रमाण वाढणे, यांच्यातील दुव्यावर अहवालात भर देण्यात आला आहे आणि त्यात लठ्ठपणाने ग्रस्त 23.1% स्त्रियांना गरोदरपणात गर्भावस्थेतील मधुमेह होतो आणि त्यामुळे माता व बाळ दोघांनाही धोका निर्माण होतो, संततीला नवजात आय.सी.यू मध्ये दाखल करण्याची आणि दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांचा तोंड देण्याची शक्यता जास्त होते. 30 किलो / मीटर2 पेक्षा जास्त बी.एम.आय असलेल्या स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याचा धोका सुद्धा वाढतो.
तज्ज्ञांचे मत
डॉ. नंदिता पालशेतकर, वैद्यकीय संचालिका, ब्लूम आय.व्ही.एफ लीलावती रुग्णालय आणि माजी अध्यक्षा एफ.ओ.जी.एस.आय पुढे म्हणाल्या, “लठ्ठपणावर प्रजनन काळात मात करणे म्हणजे प्रजनन क्षमता सुधारण्यासोबत आजीवन गुंतागुंत टाळण्याविषयी असते. लठ्ठपणाला लवकर आवर घालून करून, जे आदर्शरित्या गर्भधारणेपूर्वी केले गेले पाहिजे, आपल्याला प्रजनन परिणामांमध्ये महत्वाच्या सुधारणा करता येतील आणि गरोदरपणात जोखीम कमी करता येतील. जीवनशैलीत छोटेसे, शाश्वत बदल करण्यास स्त्रियांना मदत करण्याचे आम्ही ध्येय ठेवले आहे ज्यामुळे मातेच्या, गर्भाच्या आणि बाळाच्या आरोग्याचे रक्षण करण्यास दीर्घकाळ मदत मिळेल.”
लठ्ठपणाचा त्रास
डॉ. पिया बल्लानी ठक्कर या कन्सल्टंट एंडोक्रिनोलॉजिस्ट आहेत आणि मधुमेह व चयापचय विकारांमध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी पुढे लक्षात आणून दिले आहे की, “लठ्ठपणाकडे एखाद्या स्त्रीच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या पद्धतीने लक्ष दिले गेले पाहिजे. गर्भारशी राहू इच्छिणाऱ्या लठ्ठ स्त्रियांनी जीवनशैलीत बदल करणे सर्वाधिक महत्त्वपूर्ण असते आणि त्यांनी गर्भारशी राहण्याआधी लठ्ठपणाविरोधी औषधे बंद करण्याची गरज असते.
गरोदरपणात वजन वाढण्याकडे लक्ष ठेवले गेले पाहिजे आणि बी.एम.आय श्रेणींप्रमाणे त्याची व्यक्तीनुसार तयारी केली गेली पाहिजे. तसेच प्रसूतिपश्चात वजन सांभाळताना संरचित कार्यक्रमांचाना सामील केले गेले पाहिजे ज्यांचे लक्ष्य 0.5 किलो / आठवड्याचे वजन कमी करणे, असे असले पाहिजे. स्तनपान करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि स्तनपान थांबविल्यानंतरच लठ्ठपणाविरोधी औषधांचा विचार केला गेला पाहिजे. रजोनिवृत्ती आधी आणि रजोनिवृत्ती नंतरच्या अवस्थेत असलेल्या स्त्रियांसाठी, वजन सांभाळण्याच्या पद्धती सुरु करण्यापूर्वी स्नायूंचा साठा, हाडांचे आरोग्य आणि चयापचय विकारांची तपासणी यांचे मूल्यांकन करणे महत्वपूर्ण असते.”
लठ्ठपणा कमी करण्याचे 4 आयुर्वेदिक उपाय, 1 महिन्यात विरघळेल पोटाची चरबी
काय करावे?
प्रोत्साहन देणारी बाब म्हणजे, ओ.बी.जी करिता अशा प्रकारचे पहिले चरणअनुसार अल्गोरिदम डिझाइन करण्यात आले होते जेणेकरून त्यांना भारतीय स्त्रियांमध्ये लठ्ठपणाचा अनुमान लावता येईल आणि त्याच्यावर उपचार करता येतील. पेपरमध्ये असेही स्पष्ट केले गेले आहे की मध्यम प्रमाणात रोज व्यायाम करणे आणि उच्च तंतुयुक्त, कमी ग्लायसेमिक आहाराचे सेवन करण्यासोबत जीवनशैलीत बदल करणे, औषधोपचारांनी पाठबळ पुरवून उपचारांचा आधारस्तंभ राहणे, आणि निवडक प्रकरणांमध्ये बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करणे यांच्यासह शरीराचे साधे 5-10% वजन कमी केल्याने सुद्धा आयुष्याच्या एकूण गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करता येतात.
संदर्भ: