Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते. यासोबतच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी मदत करते. पण किडनी खराब झाल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. किडनीचे आजार झाल्यानंतर लवकर दिसून येत नाहीत. म्हणून किडनीच्या आजारांना “सायलेंट किलर” असे म्हंटले जाते. किडनीच्या आजारामध्ये वाढ झाल्यानंतर शरीरातील टॉक्सिन्स रक्तात साचून राहण्यास सुरुवात होते, ज्याचा परिणाम त्वचा, हात, पाय आणि शरीराच्या इतर अवयवांवर लगेच दिसून येतो. किडनी खराब झाल्यानंतर त्वचेवर गंभीर परिणाम दिसून येतात. ड्रायनेस, सततची खाज, लाल चकते किंवा त्वचेच्या रंगामध्ये हळूहळू बदल दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
किडनी खराब झाल्यानंतर शरीरात सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. याशिवाय काहीवेळा डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटची वेळ येते. शरीरासाठी किडनी अतिशय महत्वाचा अवयव आहे.शरीरातील मिठाचे संतुलन राखणे, हार्मोन्सचे नियमन करणे आणि हाडांची काळजी घेणे इत्यादी कार्य किडनी करते. आज आम्ही तुम्हाला किडनी खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
किडनी खराब झाल्यानंतर शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडून जाते. यामुळे त्वचा अधिक कोरडी पडणे किंवा त्वचा निस्तेज वाटू लागते. शरीरातील मिनरल्सचे संतुलन बिघडल्यामुळे रक्तात विषारी घटक तसेच साचून राहतात. यामुळे काहीवेळा त्वचा खडबडीत, ताठ, आणि कधी कधी पापुद्रे निघणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय हात आणि पायांची त्वचा अतिशय खरखरीत होऊन जाते. किडनी खराब झाल्यानंतर काहींना डायलिसिस करण्याची आवश्यकता भासते.
किडनीच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर अंगाला सतत खाज येते. ही खाज इतकी भयानक असते की रात्रंदिवस अंगाला खाज येते. अंगाला सतत खाज आल्यामुळे झोप मोड होणे, सतत चिडचिड होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. किडनीमध्ये विषारी घटक साचून राहिल्यामुळे त्वचेच्या नसांना हानी पोहचते. याशिवाय अंगांसह केसांमध्ये सुद्धा खाज येते.
किडनी खराब झाल्यानंतर प्रामुख्याने दिसून येणारे लक्षण म्हणजे शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येऊ लागते. किडनी शरीरातील अतिरिक्त मीठ आणि पाणी बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात. शरीरात फ्लुइड रिटेन्शन वाढू लागतात. यामुळे पाय, हात, चेहरा आणि डोळ्यांच्या पापण्याला सुद्धा सूज येते.
मूत्रपिंड निकामी होण्याची कारणे काय आहेत?
मधुमेह हा मूत्रपिंड निकामी होण्याचे एक प्रमुख कारण आहे.उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो आणि ते निकामी होऊ शकते.
मूत्रपिंड निकामी झाल्यास काय करावे?
मूत्रपिंड निकामी होण्याची कोणतीही लक्षणे दिसल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. आहारात बदल करा, नियमित व्यायाम करा, आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.