(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव यांच्या घराबाहेर काल रविवारी गोळीबार झाला. गुरुग्राममधील त्यांच्या घराबाहेर घडलेल्या या घटनेवर एल्विश यादव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी असेही सांगितले की ते आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे.
‘Chhaava’ पासून ‘Coolie’ किती आहे मागे? टॉप ३ मध्ये येऊनही चित्रपटाची एवढीच कमाई
एल्विशने चाहत्यांचे मानले आभार
एल्विश यादवने सोमवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘तुमच्या शुभेच्छांसाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी आणि माझे कुटुंब सुरक्षित आणि निरोगी आहोत. आमच्याबद्दलच्या तुमच्या काळजीबद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. धन्यवाद’. असे लिहून एल्विशने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
घटनेच्या वेळी युट्यूबरची आई घरीच होती
रविवारी पहाटे ५:३० वाजता गुरुग्राममधील वजीराबाद गावात एल्विश यादवच्या राहत्या घरी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी २४ राउंड गोळीबार केला. एल्विशच्या घरी गोळीबार झाला तेव्हा त्याची आई सुषमा यादव घरीच होती. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच या सगळ्या प्रकरणाची माहिती एल्विशच्या वडिलांनी ताबोडतोब पोलिसांना दिली.
‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, “घटनेनंतर सुरक्षा वाढवण्यात आली असून, या पोस्टचीही चौकशी केली जात आहे. सोशल मीडियावरील दाव्यांना आम्ही गांभीर्याने घेत आहोत. लवकरच आरोपींचा माग काढला जाईल.” एल्विश यादव याच्या चाहत्यांमध्ये या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर युट्युबरच्या सुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली आहे.