सतत कोरडा खोकला येतो? मग नागवेलीच्या पानांचे 'या' पद्धतीने करा सेवन
वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप, सतत जंक फूडचे सेवन, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे सर्दी, खोकला किंवा साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर लागण होते. साथीचे आजार शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करून टाकतात. त्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. वातावरणात वाढलेली आर्द्रता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. यामुळे सतत सर्दी खोकला वाढू लागतो. बऱ्याचदा थंड पदार्थांचे सेवन न करतासुद्धा खोकला लागतो. सतत खोकला आल्यानंतर फुफ्फुसांना हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
हल्ली सगळ्यांचं कोरड्या खोकल्याची लागण होत आहे. कोरडा खोकला झाल्यानंतर वेगवेगळे औषध, गोळ्या, सिरप इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. मात्र सतत गोळ्या औषध खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. खोकला झाल्यानंतर घसा खवखवणे, घशात वेदना होणे किंवा बऱ्याचदा खोकला वाढल्यानंतर घशात वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी नागवेलीच्या पानांचे सेवन करावे. नागवेलीची पाने आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात. नागवेलीच्या पानांचे सेवन केल्यामुळे कोरड्या खोकल्याची समस्या कायमची दूर होईल. आज आम्ही तुम्हाला नागवेलीच्या पानांचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
कोरडा खोकला झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो. नागवेलीची ४ पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर खलबत्यामध्ये नागवेलीची पाने, आल्याचा तुकडा घेऊन ठेचा. त्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये ठेचून घेतलेली पाने टाकून रस काढून घ्या. रस काढून घेतल्यानंतर त्यात मध आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर सेवन करावा.
तयार केलेला नागवेलीच्या पानांचा रस सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी प्यायल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित नागवेलीच्या पानांचा रस प्याल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. घसा खवखवणे किंवा कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी नागवेलीच्या रसाचे सेवन करावे.