वयाच्या पन्नाशी माधुरी दीक्षित टोनर म्हणून वापरते 'हा' पदार्थ, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, त्वचा होईल सुंदर
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यमुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे. माधुरी वयाच्या पन्नशीमध्ये सुद्धा एवढी तरुण आणि फिट आहे. अजूनही तिच्या सौंदर्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. माधुरी दीक्षित कायमची तिच्या फिटनेस आणि त्वचेची योग्य काळजी घेते. माधुरी दीक्षित कायम तिच्या त्वचेची खूप जास्त काळजी घेते. ती कधीच स्किन केअर रुटीन आणि हेअर केअर रुटीन फॉलो करते. त्वचेची काळजी घेण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिला स्किन केअर रुटीन फॉलो करण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन चेहऱ्यावर पिंपल्स आणि पुरळ येऊ लागतात. त्यामुळे बाजरात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त प्रॉडक्ट न वापरता त्वचेला सूट होणाऱ्या घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
वय वाढल्यानंतर त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे काहीवेळा महिला लक्ष देत नाहीत. मात्र असे केल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग येणे इत्यादी समस्या उद्भवून त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे स्किन केअर रुटीन फॉलो करताना क्लिंझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग अशा सोप्या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला माधुरी दीक्षित सुंदर त्वचेसाठी कोणत्या घरगुती पदार्थाचा वापर टोनर म्हणून करते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गुलाबाचा वापर करून माधुरी दीक्षित घरीच टोनर तयार करते. घरगुती टोनर त्वचेची गुणवत्ता सुधारते. याशिवाय यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. माधुरी दीक्षित गुलाब पाण्याचा वापर टोनर म्हणून करते, ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. गुलाब पाणी तयार करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या डिस्टिल्ड वॉटरमध्ये घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार करून घेतलेले पाणी मंद आचेवर पाणी गरम करून घ्या. पाणी गरम होऊन उकळण्यास सुरुवात झाल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग हळूहळू बदलू लागेल. गॅस बंद करून तयार केलेले टोनर थंड करा. त्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये टोनर भरून ठेवा. या टोनरचा वापर नियमित त्वचेवर केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल.
त्वचेचे पीएच संतुलित राहण्यासाठी गुलाबाच्या पाण्याचा टोनर म्हणून वापर करावा. याशिवाय गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर अनेक स्किन केअर प्रॉडक्ट बनवण्यासाठी केला जातो. यामुळे चेहऱ्यामध्ये होणारी जळजळ, सूज आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय गुलाब पाण्याचे टोनर तुम्ही मेकअप काढण्यासाठी सुद्धा वापरू शकता.