बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या चित्रपटनमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही फार ऍक्टिव्ह असते आणि आपल्या आवडीनिवडी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीचा नुकताच धमाकेदार चित्रपट ‘स्त्री 2’ मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. श्रद्धाच्या अभिनयाची प्रेक्षांकांकडून फार प्रशंसा करण्यात येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धा कपूरने आपल्या फिटनेस आणि आरोग्याचे रहस्य उघड केले. यावेळी तिने आपल्याला आवडणाऱ्या महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थाविषयी भाष्य केले.
अभिनेत्रीने वरण भात हा पदार्थ आपल्याला सर्वाधिक आवडत असल्याचे स्पष्ट केले. तिचे हे वक्तव्य ऐकून वरण भात प्रेमी तर खूपच खुश झाले. मुळात हा पदार्थच इतका साधा आणि आरोग्यदायी आहे की मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही या पदार्थाची भुरळ लागते. गरमा गरम वरण भात, वरून तुपाची सर आणि सोबत एक पापड म्हणजे स्वरसुखाहून काही कमी नाही. श्रद्धा कपूर नक्की का वरण भाताच्या प्रेमात आहे आणि याचे फायदे काय तुम्हाला माहिती आहे का? नाही आजच्या या वृत्तातून जाणून घ्या.
हेदेखील वाचा – सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचे वडील अभिनेते शक्ती कपूर पंजाबी तर आई शिवांगी कोल्हापूरे मराठी आहेत. यामुळेच श्रद्धावर लहानपानापासून कोल्हापूरचे मराठमोळे रांगडे संस्कार रुजू झाले आहेत. श्रद्धा खूप सुंदर मराठी बोलते. इतकंच नाही तर ती मराठमोळ्या संस्कृती व परंपराही मनापासून जपते. त्यातच तिला महाराष्ट्रीयन पदार्थ वरण भात फार आवडत असल्याची बातमी सर्वत्र व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – UP’च्या या शहरात वसला आहे 5500 वर्षे जुना प्राचीन कंस किल्ला, वाचा आणि जाणून घ्या