विकी कौशलचे फिटनेस रहस्य
हिंदी चित्रपट अभिनेता विकी कौशलने त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि फिटनेसच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. त्याची तंदुरुस्त आणि मजबूत शरीरयष्टी त्याच्या चाहत्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे. विकीने संभाजीराजांच्या भूमिकेसाठी केलेली मेहनत दिसून येत आहे. त्याने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर BTS देखील शेअर केले होते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार विकी मानतो की नियमित व्यायाम, योगा, मानसिक आरोग्य आणि संतुलित आहार हे निरोगी आणि मजबूत शरीरासाठी आवश्यक आहेत. विकी कौशलचा फिटनेस दिनक्रम त्याच्या दृढनिश्चय आणि समर्पणाचे प्रतिबिंबि असून तरूणांसाठी नक्कीच तो आदर्श आहे. विकी केवळ जिममध्ये तासनतास घाम गाळत नाही तर त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही खूप लक्ष देतो असे त्याने अनेक मुलाखतींमध्येही सांगितले होते. विकी नेहमीच आरोग्य निरोगी ठेवण्यावर विश्वास ठेवतो ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती तसेच मानसिक संतुलन यांचा समावेश आहे. विकी कौशलचे फिटनेस रहस्य जाणून घेऊन, तुम्ही देखील निरोगी आणि तंदुरुस्त जीवनशैली स्वीकारू शकता (फोटो सौजन्य – विकी कौशल इन्स्टाग्राम)
विकी कौशलचा संतुलित आहार
विकी कौशलला नाश्त्यात बटाट्याचे पराठे अर्थात सर्वांचे आवडते आलू पराठे आवडतात पण तो त्याचा आहार संतुलित ठेवणे देखील महत्त्वाचे मानतो. त्यांच्या आहारात कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्ससह इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश असतो. तो अंडी, ओट्स, भात, डाळ, भाज्या, रोटी इत्यादी खातो. तो दिवसभर त्याचे आवडते अन्न खातो आणि रात्रीच्या जेवणात खूप हलके आणि प्रोटीनयुक्त जेवण खाणे पसंत करतो. ज्यामध्ये भाज्यांचे सूप, ग्रील्ड चिकन इत्यादींचा समावेश आहे.
मानसिक आरोग्याकडेही लक्ष
शारीरिक तंदुरुस्तीसोबतच विकी कौशल मानसिक आरोग्याकडेही पूर्ण लक्ष देतो. तो नियमितपणे ध्यान आणि योगाचा सराव करतो कारण त्याच्या व्यस्त वेळापत्रकासाठी मानसिक शांती आणि संतुलन आवश्यक आहे. योगामुळे तुमच्या शरीराची लवचिकता वाढते आणि तुमचे स्नायू देखील मजबूत होतात. ध्यान केल्याने तो तणावमुक्त राहता येते असे मानतो. तुमच्या आयुष्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही संतुलित ठेवायचे असेल तर ध्यानधारणा गरजेची आहे.
छावासाठी विशेष तयारी
विकी कौशल त्याच्या कोणत्याही भूमिका साकारण्यासाठी शारीरिक बदल करण्यास घाबरत नाही. ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याला त्याचे वजन खूप वाढवावे लागले, त्याने शेअर केलेल्या फोटोप्रमाणे त्याला त्याचे वजन १०० किलोपर्यंत वाढवावे लागले होते आणि हा बदल साध्य करण्यासाठी त्याने प्रोटीनयुक्त आहार स्वीकारला. तो म्हणतो की तो चित्रपटानुसार त्याचा आहार आणि व्यायाम बदलतो आणि उर्वरित वेळ तो फक्त त्याची Core Strength मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
व्यस्त आणि तणावग्रस्त Office Life मध्ये पसरत आहेत 6 जीवघेणे आजार, करू नका लक्षणांकडे दुर्लक्ष
काटेकोरपणा गरजेचा
विकी कौशल म्हणतो की त्याच्या फिटनेसचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्याची शिस्त आणि सातत्य. तो म्हणतो की तो कितीही व्यस्त असला तरी तो त्याचे वर्कआउट्सला कधीच चुकवत नाही आणि नियमित ठरवल्याप्रमाणे त्याच्या आहार खातो. त्यांचा असा विश्वास आहे की फिटनेस ही एक अशी प्रक्रिया आहे जी दीर्घकालीन समर्पणाद्वारे संतुलित राहते. त्यांना निरोगी आणि फिट शरीर देण्यासाठी शिस्त आणि योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.