थंडीत हाडांच्या जुनाट वेदनांमुळे सतत कंबर दुखते? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय
राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. सगळीकडे धुकं पडत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. थंड वातावरणात हाडांच्या वेदना वाढू लागतात. कधीकाळी लागलेला मुका मार हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त त्रास देतो. मुक्कामार लागल्यानंतर शरीराच्या आतील अवयवांना इजा पोहचते. ज्यामुळे हाडे दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. शरीराची जुनी दुखणी पुन्हा नव्याने हिवाळ्यात जाणवू लागतात. शरीराच्या कोणत्याही हाडांमध्ये किंवा जॉइंट्समध्ये काहीवेळा अतिशय तीव्र आणि असह्य वेदना होतात. या वेदना वाढू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जाते. पण तरीसुद्धा शरीरात कोणताच बदल दिसून येत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. जखम झालेल्या भागात ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे हाडांमधील टिश्यू थंड होऊन जातात, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)
हाडांसंबंधित वेदनांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण संधिवात, ऑस्टिओपोरोसिस किंवा जुने फ्रॅक्चर इत्यादी आजारांमुळे हाडांमध्ये खूप जास्त वेदना होतात. थंडगार वातावरणाचा परिणाम हाडांच्या स्नायूंवर लगेच दिसून येतो. तसेच शरीरात निर्माण झालेला शारीरिक हालचालींचा अभाव गंभीर आजारांचे महत्वपूर्ण कारण आहे. त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात जास्त जाऊन बसणे आवश्यक आहे. विटामिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे खूप जास्त दुखतात.
हाडांमधील ताकद कमी झाल्यानंतर थंडीमध्ये हाडे कटकट वाजू लागतात. याशिवाय रक्तवाहिन्या आखडणे, रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होणे इत्यादी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये उष्ण आणि शरीरासाठी पौष्टिक ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. जुन्या जखमांमुळे मासपेशींवर जास्तीचा तणाव निर्माण होतो. यामुळे शरीराच्या आतील भागात खूप जास्त वेदना होतात.
नसांमध्ये का जमते चिकट प्लाक? ब्लॉकेज साफ करण्याची पद्धत तज्ज्ञांचा खुलासा, रहा हेल्दी
थंडीच्या दिवसांमध्ये दूध, दही, पनीर, काळे तीळ, गूळ इत्यादी उष्ण पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला मुबलक प्रमाणात पोषक घटक आणि कॅल्शियम मिळते. तसेच विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सकाळच्या सूर्य प्रकाशात जाऊन बसावे. यामुळे हाडांची स्थिती सुधारते. याशिवाय जुन्या जखमा व्यायाम करणे, स्ट्रेचिंग इत्यादी गसोहती करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्यामुळे शरीराचा रक्तप्रवाह सुधारतो आणि सांधे लवचिक राहतात.
हाडे का दुखतात?
पडल्यामुळे किंवा अपघातामुळे हाड तुटल्यास वेदना होतात.काही प्रकारचे कर्करोग हाडांमध्ये सुरू होतात किंवा पसरतात, ज्यामुळे वेदना होऊ शकतात.
हाडांचे आरोग्य कसे चांगले ठेवावे?
वजन उचलण्याचे व्यायाम, जसे की चालणे, धावणे, नृत्य करणे आणि फुटबॉल खेळणे, हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खावेत.






