blood pressure कमी झाल्यामुळे कायमच चक्कर येते? मग गुळासोबत मिक्स करून खा 'हा' पदार्थ, रक्तदाब राहील नियंत्रणात
रक्तदाब कमी होण्याची कारणे?
लो बीपीवर घरगुती उपाय कोणते?
हिंग आणि गूळ खाण्याचे फायदे?
जीवनशैलीत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जेवणाच्या चुकीच्या वेळा, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यसुद्धा बिघडून जाते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीत बदलांमुळे अनेकांमध्ये रक्तदाब कमी होण्याची समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. वारंवार रक्तदाब कमी झाल्यामुळे हृदय आणि मेंदूच्या आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. तरुण वयातील मुलामुलींसोबतच महिलांमध्ये रक्तदाब कमी होण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. अचानक चक्कर येणे, कमालीचा अशक्तपणा जाणवणे, हात-पाय थंड पडणे, आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. सामान्य थकवा समजून दुर्लक्ष केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे
शरीरसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने समस्या आणखीनच तीव्र होतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. रक्तदाब कमी झाल्यानंतर लवकर काही सुचत नाही. वारंवार तुम्हाला जर लो बीपीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला लो बीपीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी गुळासोबत कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात हा पदार्थ कायमच उपलब्ध असतो. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन करण्यासाठी आणि लो बीपीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी प्रभावी ठरेल. चला तर जाणून घेऊया.
रक्तदाब कमी झाल्यानंतर अनेक लोक सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. बीपी लो झाल्यानंतर शरीराला लगेच ऊर्जा मिळणे फार आवश्यक आहे. यावर गूळ आणि चिमूटभर हिंग अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. प्रत्येक स्वयंपाक घरात हिंग कायमच उपलब्ध असते. हिंगाच्या वापरामुळे जेवणाला चव येण्यासोबतच खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. तसेच हिंगाचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लो बीपीच्या त्रासावर हिंग वरदान मानले जाते. त्यामुळे रक्तदाब कमी झाल्यानंतर लगेच हिंग गुळाचे सेवन करावे. हिंग खाल्ल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.
आयुर्वेदामध्ये हिंग आणि गुळाला खूप जास्त महत्व आहे. गुळाचा एक खडा घेऊन त्याच्या मध्यभागी हिंग भरावे आणि जिभेवर ठेवून सतत चघळावे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. वारंवार वाढलेला लो बीपीचा त्रास कमी करण्यासाठी हिंग गूळ वापरावे. गुळामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. गूळ खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होण्यास मदत होते. गूळ आणि हिंग एकत्र खाल्ल्यास शरीराला लगेच ऊर्जा मिळेल. पण तुम्हाला जर वारंवार लो बीपीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.
ज्या व्यक्तींना लो बीपीचा त्रास आहे, अशांनी जास्त वेळ उपाशी राहू नये. तसेच नियमित शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यावे. यासोबतच वेळेवर जेवण, आहारात कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करणे फार आवश्यक आहे. पण वारंवार तुमचा रक्तदाब कमी होत असेल किंवा वाढत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा गंभीर आजारांची लागण होऊ शकते.
Ans: लो ब्लड प्रेशर (Hypotension) म्हणजे रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा कमी होणे. यामुळे शरीरातील अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होण्यात अडचण येऊ शकते.
Ans: वारंवार चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा, डोळ्यांसमोर अंधारी येणे, मळमळ, एकाग्रता कमी होणे आणि बेशुद्ध पडणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
Ans: गुळामध्ये काही प्रमाणात खनिजे आणि ऊर्जा देणारे घटक असतात. त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र लो ब्लड प्रेशरवरील हा निश्चित उपचार नाही.






