आतड्यांमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पदार्थांचे कोमट पाण्यातून करा सेवन, पोटासह संपूर्ण शरीर होईल डिटॉक्स
दैनंदिन आहारात खाल्लेल्या अन्नपदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पण धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, अपुरी झोप आणि वारंवार बिघडलेल्या पचनक्रियेचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ नाही झाले तर दिवसभर शरीरात अशक्तपणा जाणवतो, कोणतेही पदार्थ खाण्याची किंवा काही करण्याची इच्छा अजिबात होत नाही. शरीरात वाढलेल्या बद्धकोष्ठतेचा परिणाम मेंदूच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
तळ हातांना कायमच घाम येतो? ही समस्या नॉर्मल की कोणत्या आजाराचे गंभीर लक्षण, जाणून घ्या घरगुती उपाय
अपचन, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता, आंबट ढेकर, अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर शरीराची योग्य काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुंम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमधील हालचाल सुलभ राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यानंतर आतड्यांचं आरोग्य, त्वचा आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य निरोगी राहते.
भारतीय स्वयंपाक घरात तूप कायमच असते. तुपाचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यास कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमधील हालचाल सुलभ होईल.तुपामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील दाह कमी होऊन पोटात वाढलेली जळजळ कमी होऊन जाते.
शरीर स्वच्छ करण्यासाठी इसबगोलचे सेवन केले जाते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात, ज्यामुळे आतड्यांमधील विषारी मल सहज बाहेर पडून जातो. एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा इसबगोल मिक्स करून आठवडाभर नियमित प्यायल्यास काही दिवसांमध्ये फरक दिसून येईल. या पेयांचे सेवन केल्यानंतर भरपूर पाणी प्यावे.
जेवणातील पदार्थ किंवा सरबत बनवताना काळ्या मिठाचा वापर केला जातो. एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर काळे मीठ मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस मिक्स करून सेवन केल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि शरीराला अनेक फायदे होतील. काळ्या मिठाचे सेवन केल्यामुळे गॅस, अपचन, ऍसिडिटी किंवा पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. यामध्ये असलेले घटक शरीर कायमच संतुलित ठेवतात आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा आतड्याची हालचाल होणे.यात शौच करताना ताण येणे किंवा शौच कडक आणि कोरडी होणे यांचा समावेश होतो.
बद्धकोष्ठतेवर उपाय काय आहेत?
आहारात फायबरचे प्रमाण वाढवा. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा.नियमित व्यायाम करा. योगासने केल्याने आतड्यांची हालचाल सुधारू शकते.
बद्धकोष्ठतेची कारणे कोणती आहेत?
आहारात फायबरची कमतरता, काही औषधांचे दुष्परिणाम असू शकतात.