Liver मध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात करा 'या' घरगुती पेयांचे सेवन
‘Beer पण दारूच आहे अमृत नाही’..रुग्णाला Liver डॉक्टरचे खरमरीत उत्तर, लिव्हर सडण्याआधी वाचाच
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीट खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी बीटपासून रस किंवा भाजी बनवून खावी. यामध्ये असलेल्या बीटाइन घटकांमुळे लिव्हरमधील घाण आणि अनावश्यक साचून राहिलेली चरबी बाहेर पडून जाते. तसेच बीटमध्ये ग्लुटाथायोन हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे लिव्हरची क्षमता सुधारते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास बीटचा रस प्यावा. यामुळे रक्त शुद्ध होऊन शरीर दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी राहते.
शरीरात साचून राहिलेली घाण, कोलेस्ट्रॉल आणि लिव्हरमधील चरबी नष्ट करण्यासाठी लिंबू आणि एप्पल सायडर व्हिनेगरचे पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीराला अनेक फायदे होतील. लिंबूमधील सिट्रिक अॅसिड बाईल सॉल्ट मोठ्या प्रमाणावर आढळून येते. एप्पल सायडर व्हिनेगरचे पाणी प्यायल्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता सुधारून लिव्हर मजबूत होते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पाण्याचे सेवन करावे.
सकाळी उठल्यानंतर अनेकांना दुधाचा चहा पिण्याची सवय असते. दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढू लागते. पण त्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. यामध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स लिव्हरचे एन्झाईम्स नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. लिव्हरमध्ये वाढलेली चरबी कमी करण्यासाठी नियमित सकाळी ग्रीन टी प्यावी. त्यामुळे दिवसभरातून दोनदा ग्रीन टी चे सेवन करावे.
रात्री झोपण्याआधी नियमित हळदीच्या दुधाचे सेवन करावे. एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. हळदीमध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांमधील सर्व घाण स्वच्छ होते. हळदीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
Ans: विषाणू, अल्कोहोलचा अतिवापर, लठ्ठपणा आणि चयापचयाशी संबंधित आजार. थकवा, भूक न लागणे, वजन कमी होणे, कावीळ, त्वचेवर खाज सुटणे आणि पोटात सूज येणे.
Ans: यकृताचे कार्य, पित्त उत्पादन आणि कचरा प्रक्रिया तपासण्यासाठी या चाचण्या केल्या जातात.यकृताची सूज, डाग किंवा इतर समस्या ओळखण्यासाठी अल्ट्रासाउंड आणि इतर स्कॅन वापरले जातात.
Ans: यकृतासाठी फायदेशीर असलेले पदार्थ खा, जसे की हिरव्या पालेभाज्या, चरबीयुक्त मासे आणि हळद.प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर असलेले पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा.






