(फोटो सौजन्य – istock)
बाहेरचे अरबट चरबट खाऊन आता जवजवळ अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येने पछाडले आहे. आपले वाढते वजन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, ज्यामुळे वेळीच ते कमी करणे फायद्याचे ठरते. आता जर तुम्हीही वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल, तर यात ओट्स तुम्ही मदत करेल. ओट्स केवळ स्वादिष्टच नसतात तर त्यामध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि पोषक घटक असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बहुतेकजण आपले वजन कमी करण्यासाठी ओट्सचे सेवन सुरु करतात. परंतु या ओट्सचे सेवन कशाप्रकारे करावे याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. तुम्ही दुधात भिजवून अथवा शिजवून ओट्सचे सेवन करू शकता मात्र यातील सर्वात प्रभावी उपाय कोणता ते आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.
पायांचे घोटे काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाय करा स्वच्छ, काळे झालेले पाय होतील सुंदर
ओव्हरनाइट भिजवलेले ओट्स
रात्रभर भिजवलेले ओट्स बनवण्यासाठी, ओट्स रात्रभर दूध, दही किंवा प्लांट बेस दुधामध्ये भिजवून ठेवा. तुम्हाला ते शिजवण्याची गरज नाही.
फायदे:
शिजवलेले ओट्स
यात तुम्ही ओट्सचा शिजवून मग त्याचे सेवन करता. ही एक पारंपारिक पद्धत असून यात ओट्स गरमागरम खाल्ले जातात.
फायदे:
एका मिनिटांतच ड्रमवरील घट्ट-चिवट डाग होतील दूर, बिळबिळीत ड्रमाला अशाप्रकारे करा क्लिन
वजन कमी करण्यासाठी कशाप्रकारे करावे ओट्सचे सेवन?
जर आपण वजन कमी करण्याबद्दल बोललो तर, दोन्ही ओट्समध्ये भरपूर फायबर आणि पोषण असते, परंतु रात्रभर भिजत ठेवलेले ओट्स शरीरासाठी अधिक फायदेशीर मानले जातात. याचे कारण म्हणजे ते अधिक फायबर आणि पोषक राखून ठेवतात. भिजवून खाल्लेले ओट्स आपले पोट अधिक काळ भरून ठेवते. शिवाय ते लवकर तयार होतात ज्यामुळे घाईगडबडीच्या वेळी यांना लगेच बनवता येते.
कसे बनवावे ओट्स?
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रात्रभर ओट्स वापरायचे असतील तर तुम्ही या सोप्या पद्धतीने बनवू शकता. यासाठी एका वाडग्यात दूध किंवा दही घ्या आणि मग यात ओट्स, चिया सीड्स, सुकामेवा आणि मध घालून मिक्स करा. रात्रभर 6-7 तास ते भिजवून ठेवा आणि मग सकाळी याचे सेवन करा.