सिंगापूर हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर!
काही वर्षांपूर्वी देशासह जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातला होता. कोरोना महामारीच्या दिवसांमध्ये सगळीकडे कडक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. काही देशांमध्ये अजूनही कोरोना विषाणूचे रुग्ण आहेत. यामुळे पुन्हा एकदा जगभरात चिंता वाढली आहे. काही वर्षांपूर्वी जगभरात पसरलेल्या गंभीर विषाणूमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. सिंगापूर हाँगकाँगनंतर आता भारतातसुद्धा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढले आहे. भारत सरकारच्या कोविड-19 डॅशबोर्डवर 257 कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.त्यातील अनेक रुग्ण केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रणात आहेत. त्यामुळे काळजी घेण्यासारखे काहीच नाही.(फोटो सौजन्य – iStock)
हाँगकाँग, चीन, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. कोविड 19 हा विषाणू हवेमार्फेत सगळीकडे पसरतो. त्यामुळे या विषाणूची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात? कोरोना होऊ नये म्हणून आरोग्याची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
फणस खाल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! लघवीमधील जळजळ वाढून आतड्यांवर येईल ताण