'हे' पदार्थ खाल्ल्यानंतर अजिबात करू नका पाण्याचे सेवन, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी वायू
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबूज किंवा कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात.यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन पोटात थंडावा निर्माण होतो. याशिवाय कलिंगडमध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण टरबूज किंवा कलिंगड खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नये. पाण्याच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. यासोबतच पोटात जडपणा, पोटफुगी आणि गॅस यांसारख्या उद्भवून पचनक्रिया बिघडेल. त्यामुळे कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर ४० ते ४५ मिनिटांननंतर पाण्याचे सेवन करावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केळी खायला खूप जास्त आवडतात. केळ्यांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामध्ये असलेले नैसर्गिक साखर, फायबर आणि पोटॅशियम शोषले जाण्यासाठी शरीराला आम्ल आणि एन्झाइम्सची आवश्यकता असते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करू नये. केळ खाल्ल्यानंतर अर्धा किंवा एक तासाने पाणी प्यावे. केळ खाऊन लगेच पाण्याचे सेवन केल्यास मळमळ, पोटदुखी किंवा जडपणा जाणवू शकतो.
लघवी करताना कायमच जळजळ- वेदना होतात ? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
आंबट फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेले विटामिन सी शरीराची गुणवत्ता सुधारतात. पण आंबट फळांचे सेवन केल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीरात ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढू लागतात. कारण आंबट फळांचे सेवन केल्यानंतर शरीरात आम्लता वाढते आणि त्यानंतर पाणी प्यायल्यास ही आम्लता आणखीनच वाढत जाते. त्यामुळे आंबट फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. आंबट फळांवर पाणी प्यायल्यास आतड्यांचे संतुलन बिघडते आणि पोटात जडपणा जाणवू लागतो.
कोणत्या पदार्थांनंतर पाणी पिऊ नये?
काही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे पचनक्रिया मंदावू शकते किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
जेवण झाल्यावर पाणी कधी प्यावे?
जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पाचक रस पातळ होतात आणि पचन मंदावते.
जेवताना पाणी पिणे योग्य की अयोग्य?
जेवताना एकदम जास्त पाणी पिणे टाळावे. यामुळे पोटातील पाचक रस पातळ होऊ शकतात आणि पचनक्रिया मंदावू शकते.






