'या' औषधी पाण्याचा वापर केल्यास केसांच्या समस्या होतील कायमच्या नष्ट, महिनाभरात होतील घनदाट- मजबूत केस
सर्वच महिलांना आपले केस कायमच चमकदार आणि सुंदर हवे असतात. घनदाट आणि मजबूत केसांसाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरले जातात तर कधी केस चमकदार दिसण्यासाठी वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट केल्या जातात. पण वारंवार महागड्या हेअर ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची जास्त शक्यता असते. केसांमध्ये वाढलेला कोंडा, कोरडे केस, निस्तेजपणा इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर महिला हैराण होऊन जातात. केसांसंबधित समस्यांसाठी कायमच शाम्पू, कंडिशनरचा वापर करणे अजिबात चांगले नाही. कारण काहीकाळ परिणाम दिसू लागल्यानंतर पुन्हा एकदा केस होते तसेच होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)
केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण सुद्धा देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. केसांच्या वाढीसाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला केसांच्या समस्या नष्ट करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते आणि केस चमकदार होतात.
केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल, कांदा, कढीपत्त्याची पाने, कोरफड जेल विटामिन ई कँप्सूल इत्यादी पदार्थांचा वापर करावा. मिक्सरच्या भांड्यात खोबरेल तेल, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पाने, कोरफडीची पाने घेऊन बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेल्या मिश्रणात विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल.
हेअर स्पा करण्यासाठी हजारो रुपये खर्च करत असाल तर थांबा! शाम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ २ रुपयांची पावडर
१५ ते २० मिनिट ठेवल्यानंतर सौम्य शाम्पूचा वापर करून केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. खोबरेल तेलात फॅटी ॲसिड असते, यामुळे केस मुलायम आणि सॉफ्ट राहतात. कांद्यामध्ये सल्फर आणि अँटिऑक्सिडंट युक्त घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करणे फार आवश्यक आहे. केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा, खाज किंवा किरकोळ कोंड्याचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थाचा वापर करावा.
Ans: काही औषधी वनस्पतींचे पाणी टाळू स्वच्छ ठेवण्यास आणि केसांच्या निगेस मदत करू शकते. मात्र, केस गळणे पूर्णपणे थांबेल किंवा महिनाभरातच घनदाट केस होतील, असा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
Ans: आवळा, कढीपत्ता, मेथी, रोझमेरी, हिबिस्कस (जास्वंद), नीम (कडुनिंब) किंवा ग्रीन टी यांसारख्या घटकांपासून तयार केलेले हेअर रिन्स अनेकजण वापरतात. कोणताही नवीन उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे योग्य.
Ans: प्रथिने, लोह, बायोटिन, झिंक आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांनी युक्त संतुलित आहार घ्यावा, पुरेशी झोप घ्यावी, ताण कमी ठेवावा आणि उष्णतेच्या स्टायलिंगचा अतिवापर टाळावा.






