किडनीच्या कोणत्या तपासणी करणे आवश्यक आहे (फोटो सौजन्य - iStock)
वय वाढत असताना आपल्या शरीरामध्ये अनेक गोष्टींचे फरक होताना दिसतात आणि किडनीदेखील त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग ठरतो. सध्या अनेकांना किडनीच्या आजाराने ग्रासलेले दिसून येते. ४० वर्षांच्या वयानंतर साधारण किडनीच्या समस्यांचा धोका झपाट्याने वाढताना दिसून येत आहे, विशेषतः ज्या लोकांना उच्च रक्तदाब, मधुमेह आहे किंवा कुटुंबातील एखाद्याला मूत्रपिंडाचा आजार झाला आहे अशा लोकांमध्ये ही समस्या उद्भवलेली दिसतेय.
नवी दिल्लीतील बीएलके मॅक्स हॉस्पिटलमधील सल्लागार-नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भानू मिश्रा यांनी स्पष्ट केले की, वेळेवर किडनी चाचण्या केल्याने केवळ रोग वेळेवर शोधण्यास मदत होतेच, परंतु योग्य उपचार आणि चांगल्या व्यवस्थापनाचा मार्ग देखील मोकळा होतो. ४० वर्षांच्या वयानंतर कोणत्या किडनी चाचण्या करणे खूप महत्वाचे आहे हे डॉ. भानू मिश्रा कडून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
ब्लड युरिया नायट्रोजन (BUN) टेस्ट
ही चाचणी तुमच्या रक्तातील नायट्रोजनचे प्रमाण मोजते जे युरिया (जो एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ) पासून येते. जर पातळी जास्त असेल तर ते तुमचे मूत्रपिंड योग्यरित्या काम करत नसल्याचे दर्शवू शकते आणि ते निर्जलीकरण किंवा इतर आरोग्य समस्यादेखील दर्शवू शकते. वयाच्या 40 नंतर प्रत्येकाने ही टेस्ट करून घ्यावी
किडनी खराब झाल्यानंतर किती वेळ जगू शकतो माणूस? खराब होण्याअगोदर दिसतात ‘ही’ लक्षणे
सीरम क्रिएटिनिन टेस्ट
क्रिएटिनिन हे स्नायूंमधून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ आहे. या चाचणीद्वारे रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण मोजले जाते. जर त्याची पातळी वाढली तर याचा अर्थ किडनीच्या गाळण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. ही चाचणी सहसा BUN चाचणीसोबत केली जाते.
अनुमानित ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट (eGFR)
ही एक गणना आहे जी तुमच्या सीरम क्रिएटिनिन पातळी, वय, लिंग आणि वंशाच्या आधारावर तुमची किडनी रक्त किती चांगले फिल्टर करत आहेत याचा अंदाज लावते. जर eGFR सातत्याने 60 च्या खाली असेल, तर ते दीर्घकालीन किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते असा निष्कर्ष त्यातून निघतो
युरीन एनालिसिस
ही चाचणी मूत्र तपासणी करते आणि प्रथिने, साखर किंवा रक्त यासारख्या पदार्थांचे अंश शोधते. लघवीमध्ये प्रथिनांची उपस्थिती (प्रोटीन्युरिया) हे किडनीच्या नुकसानाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. ही एक साधी आणि नॉन-इनवेसिव्ह चाचणी आहे.
Kidney Damage Causes: किडनी सडू लागली आहे कसे ओळखावे? रात्रीच्या वेळी शरीरावर दिसतील ‘अशी’ लक्षणे
युरीन अल्ब्युमिन-टू-क्रिएटिनिन रेशो (UACR)
ही चाचणी क्रिएटिनिनशी तुलना करून लघवीतील अल्ब्युमिनचे प्रमाण मोजते. वाढलेले स्तर मधुमेह किंवा उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाच्या नुकसानाची सुरुवात दर्शवू शकतात.
या सर्व चाचणी करून घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिल्यानंतर आणि प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतरच तुम्ही ही चाचणी करून घ्यावी.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.