पार्लरमध्ये केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट 'या' पद्धतीने घरीच करा
सर्वच महिला केसांचे सौंदर्य सुंदर ठेवण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी कधी हेअर मास्क लावला जातो, तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. यामुळे केस खूप सुंदर दिसतात. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासह त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. हल्ली सर्वच महिला केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस सुंदर दिसण्यासाठी बाजारात उपल्बध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र या ट्रीट्मेंटचा परिणाम फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. तसेच केसांच्या वाढीसाठी केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी केसांना आतून पोषण द्यावे, ज्यामुळे केसांची वाढ निरोगी होईल आणि केस सुंदर चमकदार दिसतील.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
अनेक महिला केस सुंदर आणि निरोगी दिसण्यासाठी पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट करून घेतात, मात्र यामुळे केसांची गुणवत्ता अधिक खराब होऊन जाते. बाजारात स्ट्रेटनिंग, रीबाऊंडनिंग, केरेटीन इत्यादी अनेक ट्रीटमेंट मागील काही वर्षांपासून फेमस झाल्या आहेत. मात्र वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केस अधिक कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून बाजारात केली जाणारी महागडी केरेटीन ट्रिटमेंट घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तयार केलेले हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून केसांमधील गुंता काढून घ्या. त्यानंतर केसांचे दोन भाग करून ब्रशच्या सहाय्याने किंवा हातांच्या साहाय्याने तयार केलेले मिश्रण केसांच्या टाळूवर लावून नंतर हळूहळू केसांच्या टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर हेअर मास्क संपूर्ण केसांवर लावून झाल्यानंतर 30 मिनिटं तसाच ठेवून द्या. 30 मिनिटांनंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. केस धुवताना शँम्पूचा वापर करा. यामुळे केस तेलकट किंवा चिकट राहणार नाहीत.