लांबलचक केसांसाठी खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' पदार्थ
सर्वच महिलांना लांबलचक सुंदर आणि चमकदार केस हवे असतात. पण बदलत्या वातावरणामुळे, आहार, शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे केस गळण्यास सुरुवात होते. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर काही केसांना वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क लावले जातात. पण या सगळ्यामुळे केसांची चांगली वाढ होत नाही. केसांच्या निरोगी वाढीसाठी दैनंदिन आहारात विटामिन युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. शिवाय केसांची योग्य निगा राखल्यास आणि काळजी घेतल्यास केसांची योग्य वाढ होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या लांबलचक वाढीसाठी खोबरेल तेलात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हेअर केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
निरोगी आरोग्य जगण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. दिवसभरातील ३० मिनिटं व्यायाम करण्यासाठी दिली पाहिजेत. केसांच्या चमकदार आणि लांबलचक वाढीसाठी सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी कपालभाती प्राणायम करणे आवश्यक आहे. या प्राणायामाचा दररोज 15 मिनिटं सराव केल्यास केसांची वाढ मजबूत होते आणि केसांना योग्य ते पोषण मिळते. कपालभाती प्राणायाम नियमित केल्यास टाळूवरील रक्तभिसरण सुधारून केसांची वाढ चांगली होईल.
केसांच्या निरोगी वाढीसाठी विटामिन ई तेलाचा वापर करावा. हे तेल केसांना लावल्यास केस मजबूत होतात आणि स्प्लिट एंड्सची समस्यासुद्धा कमी होऊन जाते. कडुलिंबाच्या पानांची पावडर, दालचिनी पावडर आणि विटामिन ई तेल खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून लावावे. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. शिवाय यामुळे केस गळती थांबते.
कडुलिंबाच्या पानांची पावडर केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहे. खोबरेल तेलात कडुलिंबाची पावडर मिक्स करून लावल्यास टाळूवरील त्वचा स्वच्छ होईल आणि केसांची वाढ होण्यास मदत होईल. केसांमध्ये झालेला कोंडा कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची पावडर वापरावी. ही पावडर तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.यामुळे तुमचे केस मुळांपासून मजबूत होतील.
हेअर केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
लांबलचक केसांसाठी तुम्ही कढीपत्त्याच्या पानांचे तेल वापरू शकता. केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याची पाने अतिशय प्रभावी आहेत. यासाठी एक वाटी खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मूठभर कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित गरम करून घ्या. तेलाचा रंग बदलण्यास सुरुवात झाल्यानंतर गॅस बंद करून तेल थंड होण्यासाठी ठेवा. तेल थंड झाल्यानंतर गाळून बंद बाटलीमध्ये ठेवून आठवड्यातून दोनदा केसांना लावा. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील.