आवळ्याचा कसा करावा उपयोग
मधुमेह हा एक धोकादायक आजार आहे ज्यावर वैद्यकीय शास्त्राकडे कायमचा इलाज नाही. पण ते निश्चितपणे आपल्या खाण्यापिण्यामार्फत नियंत्रित केले जाऊ शकते आणि याचे व्यवस्थापन करण्यासाठी १ देशी पदार्थ जेवणानंतर साखरेची पातळी ३०% कमी करू शकतो. हे भारतीय सुपरफूड आवळा आहे. हे व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचे एक पॉवरहाऊस आहे, जे वर्षभर उपलब्ध असते.
मधुमेह कमी करण्यासाठी आवळा हे उत्तम ठरते. हे जेवणानंतर साखरेची पातळी कमी करते आणि उपवासाच्यावेळी साखरेची पातळीदेखील कमी ठेवते. न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबत अधिक माहिती दिली आहे. कमीत कमी ८ तास काहीही न खाल्ल्यानंतर ही पातळी मोजली जाते. सकाळी उठल्यानंतर अनेकदा त्याची तपासणी केली जाते. आवळा इतका फायदेशीर आहे की तो हजारो वर्षांपासून वापरला जात आहे, जाणून घेऊया अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
आवळा खाण्याची पद्धत
आवळा कसा खावा
आवळा हे अनेक गुणधर्मांनी भरलेले फळ आहे आणि आपल्या रोजच्या जेवणामध्येही आपण याचा समावेश करून घेऊ शकतो. सर्वात पहिले आपण आवळा कच्चा खाऊ शकतो. तसंच जेवणामध्ये आवळ्याचं लोणचं, आवळ्याची कढी वा अन्य पदार्थांचा वापर करून खाऊ शकतो. तर दुसरी आवळा रोज खाण्याची पद्धत म्हणजे ‘आवळा शॉट्स’. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही आवळ्याचा रस पिऊन दिवसाची सुरूवात करू शकता.
हिवाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी घरी बनवा चटकदार आवळा आणि ओल्या हळदीचा ठेवा
आवळ्याचे गुण
आवळ्यातील गुणधर्म
आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जिथे व्हिटॅमिन सी कोलेजन वाढवून त्वचा चमकदार बनवण्यास मदत करते. तिथे ते अँटिऑक्सिडंट प्रतिकारशक्ती वाढवून मुक्त रॅडिकल्सशी लढते.
आवळ्यामध्ये भरपूर फायबर असते हे सर्वांनाच माहिती आहे. जे पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठता देखील प्रतिबंधित करते. पण क्रोमियम फार कमी पदार्थांमध्ये आढळते. हे चयापचय वाढवते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
आवळा दोन प्रमुख खनिजे प्रदान करतो. एक म्हणजे कॅल्शियम आणि दुसरे म्हणजे लोह. हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असले तरी, लोह लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे अशक्तपणाचा धोकाही दूर होतो.
आवळा खाण्याचे फायदे आहेत अद्भुत, मात्र 5 व्यक्तींसाठी ‘Slow Poison’
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.