घरी बनवा चटकदार आवळा आणि ओल्या हळदीचा ठेवा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होऊन जाते. त्यामुळे आहारात उबदार आणि तिखट पदार्थांचे सेवन करावे, जे खाल्यानंतर आरोग्याला फायदा होईल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेचा हा जेवणातील पदार्थ खूप प्रसिद्ध आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी जेवणात ठेचा हा पदार्थ बनवला जातो. चवीला तिखट आणि झणझणीत ठेचा सगळ्यांचं आवडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आवळा आणि ओल्या हळदीपासून ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ठेचा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तसेच कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होते. चला तर जाणून घेऊया आवळा आणि हळदीचा ठेचा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
हिवाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर आवळा उपलब्ध असतो. पण आवळ्याची चव तुरट असल्यामुळे अनेक लोक आवळा खाणे टाळतात. पण आवळा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कँडी, आवळ्याचा मुरांबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आवळ्यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आवळा खाल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय त्वचा आणि केसांच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.