फोटो सौजन्य: Pinterest
अन्न वस्त्र आणि निवारा याचबरोबर पाणी देखील जीवनावश्यक आहे. या पाण्याशिवाय कोणताही सजीव तग धरु शकत नाही. असं म्हणतात की पाण्याला मरण नाही, मात्र तरीही पाण्याच्या बाटलीवर Expiry Date असते ? या प्रश्नाबाबत अनेकांना गोंधळायला होतं. पाणी खराब होत नाही तर मग पाण्याच्या बाटलीवर ही Expiry Date कशासाठी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..
पाण्याच्या बाटलीवर Expiry Date लिहिलेली असणं अनिवार्य असतं. खरंतर पाण्याला कुठल्याही प्रकारची Expiry Date नसते. वर्षानुवर्ष पाणी चांगलेच राहते. मात्र पाण्याच्या बाटलीवर लिहिलेली Expiry Date ही त्या बाटलीची असते. साधारणत: विकत मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या या प्लास्टीकच्या असतात. हे प्लास्टीक प्रक्रिया करुन वापरलेले असते त्यामुळे या बाटलीची Expiry Date असते. पाण्याच्या बाटल्या या रासायनिक प्रकिया करुन वापरल्य़ा जातात.त्यामुळे कालांतराने या बाटल्यांमधील रासायनिक प्रक्रियेमुळे पाणी दुषित होत. हे दुषित पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याने याचा गंभीर परिणाम शरीरावर होेऊ नये यासाठी पाण्याच्या बाटल्यांवर Expiry Date लिहिलेली असते.
अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक खाद्यपदार्थावर आणि पेयावर expiry date असणं अनिवार्य आहे. पाण्याच्या बाटलीवर expiry date कारणं म्हणजे पाणी खराब न होता, बाटली खराब होऊ शकते. त्यामुळे शुद्धतेची हमी फक्त एका मर्यादित कालावधीसाठीच दिली जाते. म्हणूनच पाण्याच्या बाटलीवर Expiry Date असते.जास्त काळ साठवलेल्या बाटल्यांमध्ये बाहे्रील वातावरण, धूळ, उष्णता, थंडी यांचा परिणाम होतो. यामुळे बाटलीतील पाणी विषारी किंवा दूषित होण्याचा धोका असतो.पाण्याच्या बाटल्या सहसा PET (Polyethylene Terephthalate) या प्लास्टिकपासून बनवलेल्या असतात. वेळोवेळी, विशेषतः उष्णतेत, हे प्लास्टिक केमिकल्स (जसे की BPA) पाण्यात मिसळू शकतात, जे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.
पाण्याच्या बाटल्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक (बहुतेक PET – Polyethylene Terephthalate) ही काही प्रमाणात रासायनिक बदलांना बळी पडू शकते. वेळेनुसार ही प्लास्टिकची बाटली तापमान, प्रकाश आणि आर्द्रतेच्या संपर्कात आल्यास त्यातून घातक रसायने (जसे की अँटीमनी किंवा BPA) पाण्यात मिसळू शकतात. त्याचप्रमाणे, एकदा जरी पाण्याची बाटली वापरली तरी त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते, आणि त्यामुळे पाणी दूषित होऊ शकते. expiry date ही ग्राहकांना सावध करण्याचा इशारा आहे की, वापरत असलेल्या बाटलीचा कार्यकाळ किती आहे ते. ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी expiry date दिली जाते. जरी पाणी “नैसर्गिकरित्या” नासणारे नसलं, तरी साठवणूक माध्यमामुळे त्याला expiry date दिली जाते. त्यामुळे, तुम्ही पाण्याची बाटली खरेदी करताना Expiry Date तपासणं नेहमीच आवश्यक आहे.