(फोटो सौजन्य: istock)
आपल्या दैनंदिन जीवनातील काही शुल्लक चुका रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवत असतात. रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) म्हणजे एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल. हे शरीरात ‘खराब’ कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते, कारण ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन धमण्यांमध्ये प्लेक (plaque) तयार करू शकते. यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोक (stroke) अशा आजारांचा धोका वाढत असतो. जर तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर काही गोष्टींकडे वेळीच लक्ष देऊन आणि आपल्या रोजच्या जीवनात काही महत्त्वपूर्ण बदल करून तुम्ही या समस्येला कायमचे दूर करू शकता. यामुळे एलडीएल कमी होण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पोषणतज्ञांच्या मते, जर तुमच्या घरात कोणाचेही कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर या पाच गोष्टींचे पालन करायला सुरुवात करा. यामुळे हृदयाचे आरोग्यही निरोगी राहील.
कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ, डोळ्यांना मिळेल थंडावा
तुपाचे सेवन
हाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुपाचे सेवन फायद्याचे ठरते. सौम्या गुप्ता म्हणाल्या, तूप हे एक विशेष चरबी आहे जे तुमच्या हृदयाचे रक्षण करते आणि शरीराला स्वतःचे कोलेस्ट्रॉल तयार करण्यापासून रोखते अशात तुम्हीही आजपासूनच आपल्या आहारात तुपाचे सेवन सुरु करा.
काजू खा
याशिवाय, काजू, शेंगदाणे आणि नारळ यांसारखे पदार्थ आपल्या शरीरासाठी फायदेकारक असतात अशात नियमित यांचे सेवन करत चला. यांच्या सेवनाने आपल्या शरीरात व्हिटॅमिन कोएंझाइम Q10 सुधारेल, जे हृदयासाठी अनुकूल आहे.
पॅकेज्ड पदार्थ खाणे टाळा
आजच्या या धावपळीच्या जगात अनेकांना सर्व पॅकेज्ड पॅकेज्ड फूड खाण्याची चुकीची सवय आहे, हे अन्नपदार्थ आपल्या आरोग्यास घातक ठरत असतात अशात अन्नपदार्थांपासून वेळीच दूर राहणे फार गरजेचे आहे. अशा खाद्यपदार्थांमध्ये पाम तेल आणि वनस्पती तेल असते जे तुमच्या हृदयासाठी अजिबात चांगले नाही.
मद्यपानापासून दूर रहा
मद्यपान आपल्या आरोग्यासाठी किती घातक ठरते ते आम्ही सांगण्याची गरज नाही. अल्कोहोलचे सेवन चांगले नाही हे माहिती असूनही अनेकजण कधीकधी का होईना याचे सेवन करू लागतात. हे आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल तयार करते. यामुळे आपल्या यकृतावरूही वाईट परिणाम होत असतो.
स्ट्रेंथ ट्रेनिंग देखील आहे.
हार्ट ब्लॉकेजचा धोका टाळण्यासाठी आठवड्यातून किमान २ दिवस वेट ट्रेनिंग करून आपल्या हृदयाच्या मांसपेशींना बळकट करा. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होतो आणि भविष्यातील धोका अनेक पटींनी टाळता येतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.