फॅटी लिव्हरचे लक्षण दिसून येईल हातात (फोटो सौजन्य - iStock)
लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होणे, ज्याला वैद्यकीय भाषेत फॅटी लिव्हर असेही म्हणतात, हा आजार दीर्घकाळ दुर्लक्षित केल्यास घातक ठरू शकतो. तथापि, पहिल्या टप्प्यात किरकोळ काळजी घेतल्यास ते पूर्णपणे बरे होऊ शकते. पण कोणत्याही लॅबमध्ये जाऊन आपण चाचणी करून फॅटी लिव्हरची तपासणी करून घेतो. त्याऐवजी तुम्हाला घरच्या घरीही याची ओळख करून घेता येऊ शकते. तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास आहे की नाही हे कसे ओळखायचे हे आपण या लेखातून जाणून घेऊया.
यासाठी त्याची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे. या लेखात, आम्ही तुम्हाला फॅटी लिव्हरच्या अशा काही सुरुवातीच्या लक्षणांबद्दल सांगत आहोत, ज्या लोक सहसा डोळ्यांसमोर असूनही दुर्लक्ष करतात आणि जेव्हा लिव्हर कुजण्याच्या मार्गावर असते तेव्हाच डॉक्टरकडे जातात आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. NIH ने दिलेल्या अहवालानुसार आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
हात लाल दिसणे

हात सतत लाल दिसत असल्यास
पाल्मर एरिथेमा म्हणूनही ओळखले जाणारे, हे फॅटी लिव्हर रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. यामध्ये हाताचे तळवे असामान्यपणे लाल दिसतात, विशेषतः अंगठ्याच्या तळाभोवती आणि करंगळीभोवती हा लालपणा स्पष्टपणे दिसून येतो. फॅटी लिव्हर असेल तर आपल्या तळहातावरील हे भाग लाल असतील तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे, तसंच त्वरीत आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा आणि पुढील उपाय सुरू करा
Fatty Liver करू नका दुर्लक्षित, Grade 2 स्थिती असल्यास टाळा ‘हे’ पदार्थ; वाढेल त्रास
त्वचेला सतत खाज येणे
जेव्हा लिव्हरमध्ये चरबी जमा होते तेव्हा हातांसह शरीराच्या अनेक भागांमध्ये खाज सुटू लागते. पोषक तत्वे आणि चरबी पचन आणि शोषणासाठी जबाबदार असलेले पित्त क्षार रक्तप्रवाहात जमा होऊ लागतात. यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज सुटते. विशेषतः तुमच्या प्रायव्हेट भागाजवळील भाग काळा पडतो आणि अधिक खाज यायला लागते. असे होत असेल तर तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास आहे हे समजून जा.
हात कोरडे पडणे

हाताला कोरड पडणे, सालपट निघणे
यकृतातील बिघाडामुळे पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जात नाहीत. अशा परिस्थितीत, त्याच्या कमतरतेमुळे, हातांची त्वचा पातळ आणि अधिक नाजूक होते. यामुळे त्वचेला दुखापत, भेगा पडणे आणि कोरडेपणा येण्याचा धोका वाढतो. हात सतत कोरडे होत असतील आणि हाताची सालं निघत असतील तर तुम्ही वेळीच तपासणी करून घ्यावी, कारण यामुळे तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास होतोय की नाही हे कळू शकते.
200 कोटी लोकांच्या लिव्हरमध्ये भरलेत घाणेरडे फॅट्स, 4 पदार्थ खाऊन आजाराला करा छुमंतर
बोटं गोलाकार होणे

बोटांची अवस्था बदलणे
फॅटी लिव्हरच्या काही प्रकरणांमध्ये बोटांचे डोके कंदयुक्त आणि गोलाकार होऊ शकतात, ज्याला क्लबिंग म्हणतात. हे लक्षण रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीत घट होण्याशी संबंधित आहे आणि सिरोसिस किंवा यकृत फायब्रोसिस सारख्या गंभीर समस्या दर्शवते. आपली बोटं ही निमुळती असतात. पण त्यात गोलाकार असा बदल होत असेल तर हे नक्कीच सामान्य लक्षण नाही. फॅटी लिव्हरच्या त्रासामुळे हे घडू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






