SuperShe Island
जगात अनेक अशी सुंदर ठिकाणे आहेत जिथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी काहीतरी खासियत असते मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका आयलँडविषयी माहिती सांगत आहोत जिथे फक्त महिलांनाच एंट्री दिली जाते. इथे पुरुषांना जाण्यास मनाई आहे. हे ठिकाण फिनलंडमध्ये वसलेलं एक खास बेट आहे ज्याचं नाव SuperShe Island असं आहे. इथे पुरुषांच्या एंट्रीसाठी सक्त मनाई आहे! चला यामागील कारण आणि आयलँडविषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.
सुपरशी आयलँडमध्ये फक्त महिलांनाच एंट्री
फिनलंडच्या शांत, निसर्गरम्य परिसरात असलेलं हे खासगी आयलंड म्हणजे स्त्रियांसाठीचं एक स्वर्ग आहे. इथे महिला स्वतःला सावरण्यास, विश्रांती घेण्यास आणि आतून मजबूत करण्यासाठी येतात. हे आयलंड प्रसिद्ध उद्योजिका क्रिस्टिना रोथ यांच्या कल्पनेतून साकार झालं. त्यांनी हे स्थान तयार केलं, जेणेकरून महिला स्वतःला मुक्त पक्षासारखं वाटू शकतील, कोणत्याही बंधनांशिवाय आणि सुरक्षित वातावरणात.
आयलँडची रचना आणि वातावरण
हे आयलंड फिनलंडच्या दक्षिण भागात, रासेपोरी जवळ सुमारे 8.4 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे. निसर्गरम्य हिरवळ, निळाशार समुद्र, आणि उंच कड्यांमध्ये वसलेले हे आयलंड मनाला एक वेगळंच समाधान देतं. इथे लक्झरी विला, सुंदर कॉटेजेस, आणि आधुनिक सुविधा यांची व्यवस्था आहे, जी निसर्गाशी सुसंगत ठेवून बांधली गेली आहे.
काय विशेष आहे सुपरशी आयलंडमध्ये?