नैवेद्याचा शिरा बनवताना गुठळ्या होऊ नये म्हणून फॉलो करा 'या' सोप्या ट्रिप्स
संपूर्ण राज्यभरात 10 जूनला मोठ्या आनंदात आणि उत्साहात गुरुपौर्णिमा साजरा केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरु हा असतोच. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे नव्याने जीवन जगण्याचा उत्साह मिळतो. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु- शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा महत्वाचा दिवस. तसेच यादिवशी देवाची पूजा करून घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. नैवेद्यासाठी बऱ्याच घरांमध्ये शिरा बनवला जातो. पण शिरा बनताना रव्याच्या गुठळ्या होतात आणि शिऱ्याची चव पूर्णपणे खराब होऊन जाते. शिरा बनवताना चूक झाल्यास संपूर्ण शिऱ्याची चवच बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त नैवेद्याचा शिरा बनवताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला शिरा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. तसेच शिऱ्याची चव सुद्धा सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – pintrest)
कोकणातील पारंपरिक पदार्थ! दुपारच्या जेवणात झटपट बनवा ‘वालाची आमटी’, नोट करून घ्या रेसिपी