दुपारच्या जेवणात झटपट बनवा 'वालाची आमटी'
दुपारच्या जेवणात चपाती, भाजी, भात , डाळ आणि इतर चमचमीत पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच डाळ किंवा डाळीची तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट वालाची आमटी बनवू शकता. कोकणात पूजेच्या नैवेद्यात किंवा कोणत्याही सणावाराच्या दिवशी अतिशय आवडीने वालाची आमटी बनवली जाते. कोकणात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये वालाची किंवा आमटी किंवा भाजी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. भाकरी किंवा भातासोबत वालाची आमटी अतिशय सुंदर लागते. त्यामुळे तुम्ही सुद्धा सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत वालाची आमटी बनवू शकता. वालांमध्ये प्रथिने, फायबर, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी वालाच्या भाजीचे किंवा आमटीचे सेवन करावे. वाल पचनासाठी अतिशय हलके असतात. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशीच नाहीतर इतर कोणत्याही वेळी झटपट वालाची आमटी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया वालाची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी स्वीट कॉर्न सूप,नोट करा रेसिपी