पायांवरील बुरशी टाळण्यासाठी प्रभावी उपाय
राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित उद्भवणारी प्रमुख समस्या म्हणजे पायांच्या बोटांमध्ये बुरशी लागणे. पायांना बुरशी लागल्यानंतर पायांमध्ये वेदना होणे, पाय लाल होणे, पायांची बोटे झोंबणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पावसाळ्यातील घाणीच्या पाण्यामुळे शरीरावरील त्वचेला हानी पोहचते. सतत येणाऱ्या घामामुळे आणि सततच्या ओलसर वातावरणामुळे पाय अतिशय खराब होऊन जातात. त्यामुळे पायात तुमच्या सुद्धा पायांना बुरशी येत असेल तर पायांची योग्य ती काळजी घ्या. या दिवसांमध्ये पायांना बुरशी येण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
UTI Home Remedies: लघवीत जळजळ आणि खाजेने हैराण झालात? Bharti Singh ने सांगितला नैसर्गिक घरगुती उपाय
चप्पल, बुटांमध्ये साचून राहिलेले पाणी आणि प्रवास करताना पायांना लागलेल्या पाण्यामुळे बोटांच्यामधील त्वचा खराब होऊन जाते. त्वचेवर बुरशी लागणे किंवा बोटांच्या मधील त्वचा निघणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे पायांना उग्र वास सुद्धा येऊ लागतो. अॅथलीट फूट’ आणि ‘पायाच्या नखांचा बुरशी’ असे देखील म्हणतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पायांना आलेली बुरशी कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तात्काळ परिणाम दिसून येईल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पायांना जास्तीचा घाम येतो. हा घाम पायांच्या बोटांमध्ये तसाच साचून राहतो. ज्यामुळे पायांची त्वचा हळूहळू काळी पडून जाते. त्वचेवर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी महिला वेगवेगळे उपाय करतात. मात्र कोणत्याही प्रॉडक्टचा वापर न करता पाय कोरडे करून घ्यावे. बाहेरून जाऊन आल्यानंतर पाय कोरडे केल्यास पायांची खराब झालेली त्वचा सुधारेल. तसेच पावसाळ्यात पायांना आलेली बुरशी कमी करण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल साबणाचा वापर करावा. या साबणाच्या वापरामुळे पाय स्वच्छ होतील. तसेच अंघोळ केल्यानंतर कोल्ड मोडवर हेअर ड्रायरने पाय सुकवून घ्या.
आपल्यातील अनेकांना नेहमीच स्टयलिश आणि दिसायला हटके असलेल्या चप्पला परिधान करायला खूप आवडतात. मात्र या चप्पलांमुळे पायांचे गंभीर नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जाळीदार आणि सहज पाणी निघून जाईल अशा शूजचा वापर करावा. यामुळे पायांना कोणतीही इजा होणार नाही. उन्हाळ्याचे शूज पावसाळ्याच्या दिवसांमध्ये परिधान करू नये.
पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये इतरांच्या वस्तू वापरू नये. यामुळे त्यांच्या शरीरातील इन्फेक्शन तुम्हाला सुद्धा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी चप्पल काढून ठेवल्यास पायांमधील बुरशी वाढण्याची शक्यता असते. कारण या चप्पला अनेकजण वापरतात. जिम आणि स्विमिंग पूलमध्ये जाताना चप्पलचा वापर करावा.