तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? मग मोहरीच्या तेलात मिक्स करा 'हा' पदार्थ
हेअर डाय लावल्यामुळे केसांचे होणारे नुकसान?
अकाली केस पांढरे होण्याची कारणे?
नैसर्गिक हेअर डाय बनवण्याची कृती?
हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे केस पांढरे झाले आहेत. केस गळणे, केस तुटणे, केस पांढरे होणे, केसांना फाटे फुटणे इत्यादी सामान्य समस्या आहेत. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर महिला हेअर केअर ट्रीटमेंट करून घेतात. केसांना रंग करणे, केसांना डाय लावणे इत्यादी अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. पण वारंवार केमिकल युक्त डाय किंवा रंग लावल्यामुळे केसांच्या मुळांचे नुकसान होण्याची शक्यता असते. अनुवंशिकता, चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट, आहारात होणारे बदल, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केस पांढरे झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात, मात्र यामुळे संपूर्ण डोक्यावरील केस पांढरे होऊन जातात आणि केसांचे नुकसान होते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करून केसांची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
आठवडाभरात चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा टोमॅटो, त्वचा होईल आतून स्वच्छ
पांढरे केस काळे करण्यासाठी महिला सतत मेहंदी किंवा हेअर डाय लावतात. पण सतत मेहंदी लावल्यामुळे केस काळे होण्याऐवजी आणखीनच पांढरे होऊन केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस कोरडे होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तेलात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे केसांच्या बऱ्याच समस्यांमुळे सुटका मिळेल आणि केस मुलायम आणि चमकदार होतील. केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केस गळती थांबवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतील.
पांढरे केस काळे करण्यासाठी मोहरीचे तेल, हळद, कॉफी पावडर, विटामिन ई कॅप्सूल, लिंबाचा रस एवढे साहित्य लागणार आहे. नैसर्गिक हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, लोखंडी कढईमध्ये मोहरीचे तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर तेलात हळद मिक्स करा. थोडा वेळ झाल्यानंतर कॉफी पावडर मिक्स करून चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर त्यात विटामिन ई कँप्सूल आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेला हेअर डाय व्यवस्थित गरम झाल्यानंतर रात्रभर झाकून ठेवा.
तयार केलेला हेअर डाय केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर हेअर डाय केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे लावा. ३० ते ४० मिनिटं ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. हेअर डाय आठवड्यातून एकदा लावल्यास पांढरे केस कमी होतील. याशिवाय कोरड्या केसांच्या समस्येपासून आराम मिळेल. नैसर्गिक हेअर डाय लावल्यामुळे केसांच्या मुळांचे कोणतेही नुकसान होत नाही. याउलट केस अतिशय सुंदर दिसतात.






