हिवाळ्यात, मुख्यतः हिरव्या पालेभाज्या आणि सुक्या भाज्या वापरल्या जातात. अर्थात हिवाळ्यात या भाज्या अप्रतिम लागतात. साधारणपणे लोकांना पालक, मेथी या भाज्या खायला आवडतात. पण, लोकांना चवळी (Chaulai Ka Saag) म्हणजे लाल हिरव्या भाज्यांबद्दल फारशी माहिती नसेल. चला जाणून घेऊया चवळीच्या भाजीचे सेवन आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे?
आहार तज्ज्ञांच्या मते, चवळीची भाजी इन्सुलिनची (Insulin) पातळी कमी करते आणि भूक नियंत्रणात ठेवते. त्यामुळे जर तुम्ही मधुमेहाचे (Diabetes) रुग्ण असाल तर चवळीची भाजी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
चवळीच्या पानात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते आणि यातील एक कप या अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिनसाठी तुमच्या दैनंदिन गरजापैकी ९७% भाग पूर्ण करू शकतो. निरोगी त्वचा आणि योग्य दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए (Vitamin A) देखील आवश्यक आहे. त्यामुळे चवळीची भाजी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवन केलीच पाहिजे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या आहारात चवळीच्या हिरव्या भाजीचा समावेश करणे आवश्यक आहे. चवळीची भाजी ही हार्मोन शरीरात सोडतो, ज्यामुळे दीर्घ काळासाठी पोट भरल्याची भावना येते.
चवळीच्या बियांमध्ये भरपूर फायबर (Fiber) असते, जे खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) कमी करते. याशिवाय चवळीमध्ये फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाणही लक्षणीय असते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
[read_also content=”किडनी स्टोनपासून मुक्ती मिळवायची आहे? करा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/to-get-rid-of-kidney-stones-these-home-remedies-can-become-a-panacea-know-the-details-here-nrvb-329578.html”]
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, चवळीच्या पानांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस आणि कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित इतर हाडांच्या आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर आहे.
चवळीच्या पानांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे त्याचा आहारात नक्कीच समावेश करा. परंतु तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर कोणतीही समस्या असल्यास, ते सेवन करण्यापूर्वी नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
चवळीमध्ये असलेले लाइसिन आणि एमिनो ॲसिड हे दोन्ही केस निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. याच्या सेवनाने केस गळण्याच्या समस्येवर बऱ्याच अंशी मात करता येते.






