शरीर थंड करण्यासाठी 'या' पद्धतीने करा डिंकाचे सेवन
देशभरात सगळीकडे ऊन वाढल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. उन्हाच्या झळा वाढू लागल्यानंतर आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात सतत होणाऱ्या बदलांकडे योग्य वेळी लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जाते.शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढण्याचे काम लिव्हर करते. याशिवाय रक्त शुद्ध होण्यासाठी लिव्हर अतिशय महत्वाचे आहे. लिव्हरचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे, भाज्यांचे आणि फळांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा थंड पाणी पिता? शरीरावर होतील अनेक गंभीर दुष्परिणाम, वाढेल हृदयाची गती
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिव्हरचे कार्य बिघडण्याची शक्यता असते. कारण शरीराची बिघडलेली पचनक्रिया, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लिव्हरवर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या थंड पेयांचे सेवन करावे. उष्णता वाढल्यानंतर पोटात जळजळ होणे, चिडचिड होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी डिंकाचे सेवन कसे करावे? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
डिंक हा पदार्थ औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी दैनंदिन आहारात डिंकाचे सेवन करावे. डिंक हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. शरीरात साचून राहिलेल्या विषारी पदार्थांमुळे लिव्हरवर दाब पडण्याची शक्यता असते. डिंकाचे सेवन केल्यामुळे लिव्हरवरील दाब कमी होऊन शरीराचे कार्य सुधारते. याशिवाय या पदार्थाच्या सेवनामुळे लिव्हरमधील निरोगी पेशी तयार होतात. डिंकामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म जळजळ कमी करण्यासाठी मदत करतात.
डिंकाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतात. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी डिंकाच्या पाण्याचे सेवन करावे. याशिवाय पोटात वाढलेली जळजळ, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. शरीरात साचून राहिलेले विषारी वायू आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. त्यामुळे डिंकाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील वायू बाहेर पडून जातील. उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी डिंकाचे सेवन करावे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. कारण शरीरात वाढलेली उष्णता आरोग्यावर परिणाम करते. वाढलेल्या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक आहारात ताक, दही, नारळ पाणी आणि इतर थंड पेयांचे सेवन करतात. यासोबतच तुम्ही डिंकाच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि फॉलिक ऍसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात.