सततच्या धावपळीमुळे आणि प्रदुषणामुळे खूप जणांना अॅलर्जीची सर्दी जाणवते. हवेतील प्रदुषण किंवा धुळीमुळे शिंका येणं, सर्दी होणं या प्रकार दिसून येतो. यामुळे अनेकजण इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरतात. मात्र याची सवय आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे. अति तिथे माती अशी एक म्हण आहे. कुठल्याही गोष्टी प्रमाणाबाहेर वापर झाला तर त्याची माती ही होतेच. हेच औषधांच्या बाबतीतही लागू होतं. सर्दी झाल्यावर अनेकांना इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरण्याची सवय असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे इनहेलर आणि नोज स्प्रे आहेत. याप्रत्येकाचा परिणाम काही मिनिटभरात होतो आणि नाक मोकळं होतं कधी बारा तास तर आठ तास असा याचा कालावधी असतो. याने होतं काय तर, सर्दीवर याचा तात्पुरता परिणाम होत असला तरी, याची सवय होणं हृदयाच्य़ा आजारांना आमंत्रण देतं, कसं ते जाणून घेऊयात.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, इनहेलर किंवा नोज स्प्रेतील स्टेरॉइड घटक श्वसनमार्गातील सूज कमी करतात, याने नाक मोकळं होतं खरं मात्र त्याचा अतिवापर केल्यास नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे लहानसहान सर्दी, खोकला किंवा धुळीचा संपर्क यामुळेही त्रास वाढतो. काही प्रकरणांमध्ये नाकातील त्वचा याने कोरडी पडते, त्यामुळे नाकातून रक्त येणे, गंध जाणे अशा समस्या जाणवतात. त्याचशिवाय नाकाच्या संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकते.इनहेलरचा अति वापर केल्यास याचा परिणाम घशावर देखील जाणवतो. . एवढंच नाही तर भविष्य़ात या सवयी हृदय विकाराचा झटका येण्यास देखील कारणीभूत ठरु शकते.
सतत घसा बसणे, आणि हृदयगती वाढणे असे गंभीर परिणाम यामुळे दिसून येतात. अनेक रुग्ण इनहेलर किंवा नोज स्प्रे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ वापरतात. मात्र ही सर्वात मोठी चूक ठरते.तज्ज्ञ सुचवतात की, या औषधांचा वापर केवळ तात्पुरता आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. तसेच धूळ, धूर, परफ्युम, पाळीव प्राणी यांसारख्या अॅलर्जीक घटकांपासून दूर राहणे, घरातील हवा शुद्ध ठेवणे आणि श्वसनव्यायाम (प्राणायाम) करणे हा उत्तम पर्याय ठरतो.शेवटी, इनहेलर आणि नोज स्प्रे हे उपाय आहेत, कायमस्वरूपी समाधान नाही. त्यामुळे “सहज सवय” न बनवता वैद्यकीय सल्ल्यानुसार वापर करणं गरजेचं आहे.
दमा, सायनस, अॅलर्जी, श्वास घेण्याचा त्रास किंवा सतत सर्दी-खोकला अशा समस्या आजच्या बदलत्या हवामानात आणि प्रदूषणामुळे सर्वसामान्य झाल्या आहेत. यावर तातडीचा उपाय म्हणून अनेक जण इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरतात. काही लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने हे वापरतात, तर अनेकजण स्वतःहूनच “सवय” लावून घेतात. पण आता तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. तुम्हालाही नोज स्प्रे किंवा इनहेलरची सवय असेल तर तुमचं आरोग्य दीर्घकाळासाठी धोक्यात येऊ शकतं. या औषधांमध्ये प्रामुख्याने स्टेरॉइड्स, डीकॉन्जेस्टंट्स आणि केमिकल घटक असतात. हे घटक नाकातील किंवा श्वसनमार्गातील सूज कमी करून काही मिनिटांत आराम देतात. म्हणूनच लोकांना तत्काळ फरक जाणवतो. मात्र याचा अतिवापर अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे साधी सर्दी असो किंवा अॅलर्जीची सर्दी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार स्वत:चे स्वत: करु नयेत.






