हाय हिल्सचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का (फोटो सौजन्य - Pinterest)
हाय हिल्स घालून फॅशन करताय? थांबा, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक वाचा दुष्परिणाम
हाय हिल्सचा इतिहास
हाय हील्सचा इतिहास खूपच रंजक आहे. १० व्या शतकात पर्शियन घोडेस्वारांनी हाय हिल्स अस्तित्वात आणले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकेकाळी पुरुषत्व, उच्च सामाजिक दर्जा आणि युद्धाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हील्स आता महिलांच्या फॅशन आणि सौंदर्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. हील्सच्या इतिहासाचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ते आपण जाणून घेऊया
कोणते आहेत टप्पे
पुरुषांनी ते घालणे का बंद केले?
१९व्या शतकापर्यंत, फॅशनमध्ये एक मोठा बदल झाला होता. समाजाने पुरुषांच्या कपड्यांमध्ये आणि पादत्राणांमध्ये साधेपणा आणि तर्कशुद्धतेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. परिणामी, पुरुषांनी हील्स घालणे बंद केले आणि हाय हील्स केवळ महिलांच्या फॅशनचा भाग बनल्या. तर १९५० च्या दशकात आधुनिक स्टिलेटोचे आगमन झाले फॅशनमध्ये क्रांती झाली. हे नाव एका पारंपरिक इटालियन कट्यारावरून प्रेरित होते. आज, हाय हील्स म्हणजे आत्मविश्वास, सौंदर्य आणि ग्लॅमरचे दुसरे नाव झाले आहे.






