(फोटो सौजन्य: istock)
आपल्या स्वयंपाकघरात आपण अनेक गोष्टींचा वापर करत असतो. यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरातील धारदार चाकू. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला याची फार मदत होत असते. भाज्या कापण्यासाठी अथवा कोणत्या गोष्टीचे रॅपर उघडण्यासाठी आपण कात्रीचा वापर करत असतो. या दोन गोष्टी प्रत्येकाच्या घरात हमखास पाहायला मिळतात. मात्र रोजच्या वापरामुळे बऱ्याचदा यांची धार कमी होऊ लागते आणि मग याने काम करणे कठीण होते.
तुमचा Ex खरंच Second Chance मिळवण्याच्या पात्रतेचा आहे का? या संकेतांवरून करा पारख
एकदा का चाकूची धार निघून गेली की मग भाज्या कापण्यास फार त्रास होऊ लागतो, भाज्या हव्या तशा कापता येत नाहीत. बाजारात चाकू-कात्रीला धार देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र यासाठी तुम्हाला तुमचे पैसे घालवावे लागतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही आपले पैसे न घालवताही घरीच सोप्या पद्धतीने तुमच्या जुन्या चाकूला नव्यासारखी धार आणि चमक देऊ शकता. यासाठी काही घरगुती पदार्थ यात तुमची मदत करतील.
मीठ
तुमच्या कात्रीला किंवा चाकूला जर तुम्हाला धार द्यायची असेल तर तुम्ही यासाठी घरात उपलब्ध असलेल्या मिठाचा वापर करू शकता. यासाठी एका मोठ्या वाटीत मीठ घ्या आणि हलक्या हाताने हे मीठ चाकू-कात्रीवर फिरवा/चोळा. या प्रक्रियेमुळे ब्लेडवरील गंज किंवा अशुद्धता निघून जाते आणि कात्री पुन्हा धारदार होते. यासाठी अधिक घाई करू नका आणि हळुवारपणे मिठाला घासा.
ॲल्युमिनियम फॉइल
स्वयंपाकघरात अनेकदा ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. याचा वापर करून तुम्ही घरातील चाकू-कात्री धारदार बनवू शकता. यासाठी ॲल्युमिनियम फॉइल घ्या आणि चार पाच वेळा त्याची घडी करा. आता या घडी घातलेल्या फॉइलला कात्रीने कट करत राहा. काही वेळानंतर तुम्हाला तुमची कात्री धारदार झाल्याचे जाणवेल.
चिकन लव्हर्ससाठी खास! घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल Butter Chicken; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश
टूथपेस्ट
टूथपेस्टमध्ये बारीक ग्रॅन्युल्स असतात, जे कोणत्याही गोष्टीला स्वछ किंवा चमकदार बनवण्यास मदत करतात. टूथपेस्टचा वापर करून चाकू आणि कात्री धारदार केली जाऊ शकत. यासाठी टूथपेस्ट चाकू किंवा कात्रीवर टाका आणि स्क्रबच्या मदतीने तो भाग घासा. हे केल्याने ब्लेडवरील अडथळे दूर होतात आणि धार अधिक तीव्र होते. या सोप्या, घरगुती आणि प्रभावी उपायांनी तुम्ही नेहमीसाठी चाकू कात्रीला धारदार बनवू शकता.