वजन वाढविण्यासाठी काय खावे
तुम्ही तुमच्या बारीक शरीरामुळे हैराण असाल आणि लोक तुम्हाला हाडाची काडं अथवा कोरडे पापड असे म्हणत चिडवत असतील तर काळजी करू नका. वजन वाढण्यासाठी योग्य आहार आणि डाएट तुम्ही फॉलो करू शकता. आजपासूनच या गोष्टींचा आहारात समावेश करा. महिन्याभरात तुमचे वजन वाढेल आणि तुमचे शरीर भरलेले दिसू लागेल.
डाएटिशियन निखिल वत्स यांनी काही महत्त्वाच्या टिप्स या लेखातून दिल्या आहेत. तुम्हीही जर बारीक असाल आणि तुमचे वजन वाढत नसेल तर तुम्ही या टिप्स आणि हा आहार नक्की फॉलो करा. मात्र त्याआधी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे कारण प्रत्येकाची प्रकृती ही सारखी नसते. चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांचा करावा समावेश. (फोटो सौजन्य – iStock)
वजन कसे वाढवाल?
वजन वाढविण्यासाठी काय करणे आवश्यक
आजकाल बहुतेक लोक त्यांच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असले तरी काही लोक त्यांच्या बारीक असण्याची वा बारीक शरीराची चिंता करतात. लठ्ठपणाप्रमाणेच अगदी बारीक शरीरदेखील कधीकधी लाजिरवाणे बनते. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर येथे जाणून घ्या कोणते पदार्थ तुमचे वजन झपाट्याने वाढवतात. तुम्ही या पदार्थांचा वापर केल्यास, एक महिन्यातच तुम्हाला योग्य परिणाम दिसून येईल.
प्रोटीन शेक
नियमित प्रोटीन शेक प्यावे
प्रोटीन शेकसोबतच सपोर्टिव्ह डाएटही घ्यावा लागतो. यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते आणि स्नायूंच्या वाढीस मदत होते. तुमची शरीरयष्टी योग्य पद्धतीने बिल्ट व्हावी असे वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य ब्रँडचे प्रोटीन शेक आपल्या नाश्त्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे. यामुळे शरीरामधील उर्जा व्यवस्थित राखली जाते आणि वजन वाढण्यास मदत मिळते.
हेदेखील वाचा – वजन वाढवण्यासाठी काय खावे ते जाणून घेऊया
डेअरी उत्पादने
दूध आणि दुधापासून बनणारे पदार्थ खावे
साय असलेले दूध तसेच सायीचे दही आणि चीज या पदार्थांमध्ये कॅलरीज, प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. रोज खाल्ल्याने वजन खूप लवकर वाढते. तुम्ही नियमित चीज खाल्ले, तसंच आहारात लोणी, बटर, तुपाचा समावेश केला तर तुमचे वजन योग्य पद्धतीने वाढू शकते आणि डाएटनुसार खाल्ल्यास वजन वाढण्यासह इतर आजारांपासूनही तुम्ही दूर राहता.
ॲव्होकॅडो
अवाकाडो ठरेल फायदेशीर
ॲव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी असते. तुम्ही याचा वापर ॲव्होकॅडो सँडविच, सॅलड आणि स्मूदीमध्ये करू शकता. ॲव्होकॅडो रोज खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. महिन्याभरात वजनातील फरक दिसून येईल. तसंच तुमच्या डाएटिशियनच्या सल्ल्याप्रमाणे याचा वापर केल्यास महिनाभरात तुम्हाला योग्य परिणाम दिसून येईल.
हेदेखील वाचा – तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे आहे का? जाणून घ्या या 6 टिप्स
ड्रायफ्रूट्स
सकाळी उठून भिजवलेले ड्रायफ्रूट्स खावे
बदाम, अक्रोड, खजूर, जर्दाळू, चीकू आणि प्लम या सर्व फळांमध्ये कॅलरी आणि पोषक तत्वे जास्त असतात. हे ड्रायफ्रूट्स तुम्ही नियमित खाण्यास सुरूवात केली तर परिणाम लवकरच दिसून येईल. रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा अथवा दुधात मिसळून शेक बनवा. दुधासोबत प्यायल्याने त्याचा परिणाम लवकर दिसून येतो.
भात
नियमित भात खाण्याने वाढेल वजन
तांदळात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. रोज दिवसरात्र भात खाल्ल्याने वजन वाढते. भातामध्ये तूप घालून खाल्ल्यास त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. तसंच तुम्ही भातामध्ये पनीर, चीज, तेल आणि तुपाचा अधिक वापर केल्यासदेखील तुमचे वजन योग्य पद्धतीने वाढण्यास मदत मिळते. आपल्या डाएटिशिनकडून योग्य आहार लिहून घ्या आणि फॉलो करा
रताळे
रताळ्याचा करून घ्या आहारात समावेश
आपल्याकडे सहसा उपवासाच्या दिवशी रताळ्याचा उपयोग होतो. अन्यवेळी रताळ्याची भाजी वा रताळ्याचा किस केला जात नाही. मात्र तुम्हाला वजन वाढवायचे असल्यास रताळे हा उत्तम पर्याय आहे. रताळ्यात कार्ब्स, विटामिन आमि मिनरल्स असून वजन वाढण्यास मदत करते. तुम्ही नियमित रताळे उकडून खाल्ल्यास याचा चांगला परिणाम दिसू शकतो.
अंडे
अंडी खाण्याचे फायदे
अंड्यामध्ये नैसर्गिक प्रोटीन्सचा समावेश असतो आणि हाडांच्या मजबूतीसाठी अंडे अत्यंत फायदेशीर ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. वजन वाढविण्यासाठीही नियमित अंडी खाण्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. अंड्याचा बलक अर्थात त्याचा पिवळा भाग हा वजन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.