नाश्त्यासाठी बनवा चवदार पौष्टिक आलू मेथी पराठा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पालेभाज्या आणि इतर फळभाज्या मोठ्या प्रमाणावर मिळतात. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते. पालक, मेथी, चवळी, मुळा, शेपू इत्यादी अनेक पालेभाज्या बाजारात मिळतात. अनेकदा थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही ताज्या मेथीच्या भाजीपासून आलू मेथी पराठा बनवू शकता. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पराठा हा पदार्थ खूप आवडतो. पराठा बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. शिवाय कमीत कमी साहित्यामध्ये पराठा तयार होतो. लहान मुलांना मेथीची भाजी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना या पध्दतीनीने नवनवीन पदार्थ नाश्त्यात किंवा डब्यात बनवून देऊ शकता. चला तर जाणून घेऊया आलू मेथी पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा