१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. घाईगडबडीच्या वेळी ब्रेड बटर किंवा चहासोबत बिस्कीट आणून खाल्ले जाते. मात्र नेहमीच ब्रेड खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ब्रेड टिक्की बनवू शकता. ब्रेड टिक्की बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. बऱ्याचदा घरातील लहान मुलं ब्रेड खाऊन ब्रेडच्या बाजूच्या कडा काढून फेकून देतात. मात्र या कडा फेकून न देता तुम्ही त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या वाढल्यानंतर पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. यापूर्वी तुम्ही मटार टिक्की, आलू टिक्की किंवा मिक्स भाज्यांपासून बनवलेली टिक्की खाल्ली असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला ब्रेडची टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया ब्रेड टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे, नोट करून घ्या रेसिपी