हिवाळ्यात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी फ्लॉवर पकोडे
राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेली कांदाभजी, बटाटाभजी इत्यादी पदार्थ आणून खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फ्लॉवर पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना फ्लॉवरची भाजी खायला अजिबात आवडत नाही. पण फ्लॉव्हरमध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. घरात कायमच वेगवेगळ्या भाज्या आणल्या जातात. पण लहान मुलं भाज्या आवडीने खात नाही. मुलांना कायमच चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. याशिवाय फ्लॉवरपासून कोणताही पदार्थ बनवताना फ्लॉवर व्यवस्थित बघून घ्यावा. कारण या भाजीमध्ये कीड आढळून येते. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे कायमच सेवन करावे. चला तर जाणून घेऊया फ्लॉवर पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा






