दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा पालक सांबार
दैनंदिन आहारात नियमित पालेभाज्यांचे सेवन करावे. पालेभाज्या खाल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. याशिवाय शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी पालेभाज्यांचे सेवन करावे. पण लहान मुलांसह मोठ्यांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पालेभाज्यांचे नाव काढल्यानंतर नाक मुरडतात. त्यातील अनेकांना न आवडणारी भाजी म्हणजे पालक. पालकपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पालक पनीर, पालक डाळ, पालक राईस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी पालक सांबार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक सांबार भात किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबतच अतिशय चविष्ट लागेल. जेवणात कायमच गोडी डाळ, तिखट डाळ किंवा आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी झटपट तुम्ही पालक सांबार बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पालक सांबार बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
साध्या जेवणाला द्या हटके चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, चवीसोबतच शरीर राहील हेल्दी
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा






