१० मिनिटांमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी झटपट बनवा दहीकांडी
वाढत्या उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. नारळ पाणी, ताक, दही, कोकम सरबत इत्यादी अनेक थंड पेयांचे सेवन केले जाते. या दिवसांमध्ये शरीरात वाढ्लेली उष्णता बऱ्याचदा आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे उन्हात बाहेर गेल्यानंतर किंवा घरी असताना थंड पदार्थांचे भरपूर सेवन करावे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर लहान पाणी बाजारात मिळणाऱ्या सरबताचा पाकिटांपासून कांडी किंवा गोळा बनवायला जायचा. याशिवाय अनेक घरांमध्ये घट्टसर दही वापरून आईस्क्रीम बनवले जायचे. उन्हाळा वाढल्यानंतर आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स इत्यादी पदार्थ खाण्यावर जास्त भर दिला जातो. मात्र सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला, घसा बसणे, डोकं दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दहीकांडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली दहीकांडी खाल्यास लहान पणाची आठवण सगळ्यांचं होईल. तुम्ही बनवलेली दहीकांडी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यत सगळ्यांचं नक्की खूप आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात थकवा होईल कायमचा दूर! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत, नोट करून घ्या रेसिपी
उन्हळ्यात घरी बनवा थंडगार मसाला ताक, शरीराला ठेवेल हायड्रेट; त्वरित जाणून घ्या रेसिपी