लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा 'हे' पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत
वजन कमी करण्यासाठी उपाय?
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात काय खावे?
लठ्ठपणाची कारणे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक इत्यादी गंभीर आजाराने असंख्य लोक त्रस्त आहेत. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने समस्या वाढतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीरात लठ्ठपणा वाढल्यानंतर पोट, मांड्या आणि हातांच्या दंडांवर चरबीचा अनावश्यक थर वाढू लागतो. ज्याच्या परिणामामुळे चालताना थकल्यासारखे वाटते, धाप लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे हार्ट अटॅक किंवा इतर गंभीर आजारांचा धोका सुद्धा वाढतो. त्यामुळे योग्य वेळी वजन कमी करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा बाजारात उपलब्ध असलेले महागडे सप्लिमेंट्स, तासनतास जिम तर काहीवेळा उपाशी राहून वजन कमी केले जाते. पण चुकीच्या पद्धतीने वजन कमी केल्यास पोटावरील चरबी कमी होण्याऐवजी शरीरात अशक्तपणा वाढतो आणि शरीराला इतर आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
सकाळच्या नाश्त्यात कार्ब्स असलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करावे. कार्ब्स असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते. याशिवाय फायबर आणि प्रोटीन असलेले पदार्थ सुद्धा खावेत. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. नाश्त्यात फायबर असलेले पदार्थ खाल्ल्यास पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.
सकाळच्या नाश्त्यात १ वाटी कडधान्यांची उसळ खाल्ल्यास शरीराला आवश्यक कार्ब्स आणि प्रोटीन्स मिळेल. याशिवाय पोह्यांसोबत दूध, दही, बदाम, ताक असे कॉम्बिनेशन घेतल्यास पोषणाची कमतरता भरून निघेल. रोजच्या आहारात नियमित पालेभाज्या, फळे, वेगवेगळ्या भाज्या घालून बनवलेल्या पराठ्याचे सेवन करावे. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता भरून निघते.
सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास लवकर भूक लागत नाही आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. याशिवाय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा जिऱ्याची पावडर मिक्स करून प्यायल्या महिनाभरात पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. याशिवाय कधीतरी नाश्त्यात बेसन धिरडं सुद्धा खावं. याशिवाय साऊथ इंडियन पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
Ans: फायबरयुक्त भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, ताक, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थ नियमित खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
Ans: होय. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि पारंपरिक पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.
Ans: नाही. उपाशी राहण्याऐवजी कमी कॅलरी आणि जास्त पोषणमूल्य असलेला संतुलित आहार घेणे अधिक फायदेशीर ठरते.






