कोकणातील पारंपरिक पदार्थाने करा गणपती सणाची सुरुवात!
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर अतिशय आवडीने वाट पहिला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव. गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे चाहूल लागली आहे. बाप्पाच्या स्वागताची मोठ्या जलौषात तयार केली जात आहे. गणपती उत्सवामध्ये कोकणात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. कोकणातील पारंपरिक पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. गणपती उत्सवात अतिशय आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे काकडीचे धोंडस. धोंडस हा केवळ पदार्थ नसून कोकणाशी असलेले अतूट नाते आहे. तांदळाचे पीठ, काकडी आणि गुळाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. पण बऱ्याचदा धोंडस बनवताना चुका होतात. वाफेवर शिजवला जाणारा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. याशिवाय काकडीपासून बनवलेले धोंडास बाप्पाच्या नैवेद्यातील प्रमुख पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊया काकडीचे धोंडस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






