कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी खाल्ले जाते खिमट!
कडक उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. उन्हाळा वाढल्यानंतर तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे नकोसे वाटते. तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यानंतर अपचन किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे. कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे खिमट. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खिमट खायला खूप आवडते. खिमट खाल्ल्यानंतर पोटसुद्धा लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही. खिमट बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. याशिवाय अनेक घरांमध्ये आजारी व्यक्तीला खिमट खाण्यास दिले जाते. खिमट आणि त्यावर तूप मेतकूट टाकून खाण्यास दिले जाते. चला तर जाणून घेऊया चवदार खिमट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
हिरव्यागार झणझणीत तिखट मिरच्यांपासून बनवा चविष्ट आंबट लोणचं! नोट करून घ्या लोणचं बनवण्याची कृती
आंबोळ्यांसोबत चटणी खाऊन कंटाळा आहे? अस्सल मालवणी पद्धतीमध्ये बनवा काळ्या वाटण्याची चविष्ट उसळ