उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कोकणातील ‘कोळाचे पोहे’
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच पोहे, शिरा किंवा उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवनवीन पदार्थ खावेसे वाटतात. सर्वच घरांमध्ये पोहे हा पदार्थ उपलब्ध असतोच. कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर चहापोहे खाल्ले जातात. पोहे खाल्यानंतर पोटही भरते. याशिवाय भारतातील वेगवेगळ्या गावात वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे. याशिवाय कोकणात नारळाचे दूध सहज उपलब्ध होते. कोकणात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कोळाचे पोहे. कोकणात हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोकणात बनवले जाणारे कोळाचे पोहे सोप्या पद्धतीमध्ये बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून पोहे बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)
कच्च्या कैरीपासून बनवा आंबटगोड चवीचा चटपटीत मेथांबा! जेवणात येईल मस्त चव, नोट करून घ्या रेसिपी
चिकन लव्हर्ससाठी खास! घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल Butter Chicken; लज्जतदार चवीने सर्वच होतील खुश