घरबसल्या बनवा थायलंडमध्ये मिळणारे थंडगार गुलाबी ड्रिंक
उन्हाळा ऋतूमध्ये थंड पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांसोबतच शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. थंड पदार्थ खाण्याची इच्छा किंवा पिण्याची इच्छा झाल्यानंतर ताक, दही, लस्सी, सरबत, कोकम सरबत इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही थायलंडमध्ये बनवलेले जाणारे मोगू-मोगू पेय घरच्या घरी बनवू शकता. थायलंडमध्ये हे पेय अतिशय महाग आहे. याशिवाय जगप्रसिद्ध पेयांची चव घेण्यासाठी अनेक लोक थायलंडमध्ये जातात. या पेयांमध्ये नारळाच्या जेलीसारखा पदार्थ असतो. या पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरबसल्या थायलंडमध्ये बनवले जाणारे मोगू-मोगू पेय बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पेयांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)