सतत कोल्ड्रिंक किंवा सोडा पिण्याऐवजी झटपट घरी बनवा थंडगार पान सरबत, शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर तहान भागवण्यासाठी वेगवेगळ्या थंडगार पेयांचे सेवन केले जाते. कधी ताक, लस्सी तर कधी कोल्ड्रिंक, सोडा किंवा थंड पाणी पिऊन तहान भागवली जाते. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वर्णवर घसा सुकल्यानंतर खूप जास्त तहान लागते. तहान लागल्यानंतर कायमच थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक प्यायले जाते.नेहमीच सोडा पिणे शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात घरी बनवलेली थंडगार पेय पिण्यावर जास्त भर द्यावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पान गुलकंद सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सरबत चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा प्रभावी ठरेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यसाठी विड्याचे पान खाल्लेले जाते. गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखरेचा वापर करून बनवलेले गुलकंद शरीरात थंडावा टिकवून ठेवते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पान सरबत प्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी






