शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा
श्रावण महिन्यात घरामध्ये अनेक गोडाचे पदार्थ बनवले जातात. शिरा, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ला किंवा साबुदाणा खीर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही पपईचा हलवा बनवू शकता. श्रावण महिन्यात सर्वच घरांमध्ये पूजा, व्रत आणि धार्मिक पूजांचे आयोजन केले जाते. पूजेच्या प्रसादात कायमच शिरा बनवला जातो. मात्र नेहमीच शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही पपईपासून झटपट हलवा बनवू शकता. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण जास्त गोड पदार्थ खाणे टाळतात. पण तुम्ही पपईच्या हलव्याचे सेवन करू शकता. कारण पपईचा नैसर्गिक गोडवा पदार्थाची चव वाढवण्यास मदत करतो. चला तर जाणून घेऊया पपई हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी