सोप्या पद्धतीमध्ये बनवा घरी बनवा मऊसूत खोबरं पोह्यांची इडली
सकाळच्या नाश्त्यात सर्वच घरांमध्ये इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा इत्यादी साऊथ इंडियन पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे इडली. मऊलुसलुशीत इडली खाल्यानंतर पोटही भरते आणि पचनास सुद्धा फायदे होतात. तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून इडली बनवली जाते. मात्र नेहमी नेहमी तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून बनवलेली इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही खोबर आणि पोह्यांचा वापर करून चविष्ट आणि पौष्टिक इडली बनवू शकता. अनेकदा तुम्ही पोह्यांचा वापर करून बनवलेली इडली खाल्ली असेल पण खोबऱ्याची इडली चवीला अतिशय सुंदर लागते. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात ही इडली बनवू खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया खोबरं पोह्यांची इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Masala Pav: स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास 15 मिनिटांची रेसिपी, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल
Mahashivratri Special: उपवासाच्या दिवशी सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा उपवासाचे कुरकुरीत कटलेट्स