सोप्या पद्धतीमध्ये बनवा Strawberry Lassi
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये दही, ताक आणि लस्सी अतिशय आवडीने प्यायली जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लस्सी प्यायला खूप जास्त आवडते. लस्सीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. दही, दूध आणि साखरेचा वापर करून लस्सी तयार केली जाते. मात्र नेहमीच साधी लस्सी पिऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये थंडगार स्ट्रॉबेरी लस्सी बनवू शकता.लालचुटुक स्ट्रॉबेरी सर्वच ऋतूंमध्ये बाजारात उपलब्ध असते. विटामिन सी युक्त स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास शरीरासह त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतात. थंडगार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि उष्णता कमी होते. चला तर जाणून घेऊया स्ट्रॉबेरी लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)