जेवणात करा झणझणीत बेत! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टोमॅटो ठेचा
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं जेवणाच्या ताटात काहींना काही झणझणीत पदार्थ हवा असतो. कधी जेवणात तिखट भाजी बनवली जात तर कधी मसालेदार तिखट आमटी बनवली जाते. पण नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटोचा ठेचा बनवू शकता. याआधी तुम्ही मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचा ठेचा किंवा लसूण ठेचा खाल्ला असेल. कोल्हापुरी चवीचा ठेचा जेवणात असेल तर चार घास जेवण जास्त जाईल. टोमॅटोचा ठेचा आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतो. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत ठेचा अतिशय सुंदर लागेल. तोंडाची चव बदलण्यासाठी तुम्ही टोमॅटो ठेचा बनवू शकता. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटो ठेचा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त